आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमए आणि नेटचे पेपर आले एकाच दिवशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे घेण्यात येणारी नेट परीक्षा 30 जूनला राज्यातील विविध केंद्रांवर होणार आहे. मात्र याच दिवशी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा एम. ए. मराठी विषयाचा पेपर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर नेट परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

विद्यापीठाने मात्र मुंबईच्या काही विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर ही परीक्षेची तारीख बदलल्याचे सांगत यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. नेटची तारीख मेहमीप्रमाणे जवळपास दोन महिने आधीच जाहीर झाली. मात्र मुक्त विद्यापीठाने आपल्या परीक्षांचे नियोजन करताना याचा विचार केला नाही. त्यामुळे दोन्ही परीक्षांची एकच तारीख जाहीर झाली. विशेष म्हणजे आधीची तारीख बदलून ही तारीख जाहीर केल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना कुठलीही एकच परीक्षा द्यावी लागेल, अशी स्थिती झाली आहे.

पदवी मिळवणे महत्त्वाचे असल्याने इच्छा असतानाही या विद्यार्थ्यांना नेटची परीक्षा देताच येणार नाही. परीक्षेचे वेळापत्रक प्रथम जाहीर झाले, तेव्हा या पेपरची तारीख 24 जून होती. मात्र विद्यापीठाने त्यात अचानक बदल करत ती 30 जून केली. मराठी विषयासाठी जवळपास पाच हजार विद्यार्थी बसले असून, यातील पन्नास टक्के विद्यार्थ्यांना नेटपासून वंचित राहावे लागेल.

प्रथम वर्षासाठी 3,219 आणि द्वितीयसाठी 2,092 विद्यार्थी बसले आहेत. गेल्या वर्षीही अशीच समस्या झाली होती. विद्यापीठाने नेट परीक्षेच्या दिवशीच पदव्युत्तरचीपरीक्षा ठेवली होती.

‘त्यांच्या’ पदोन्नतीसाठी.
दोन्ही वर्षे मिळून 5, 311 विद्यार्थी मराठीला बसले आहेत. त्यातील 70 टक्के विद्यार्थी मुंबई पालिकेचे आहेत. त्यांना पदोन्नतीसाठी याची गरज असून, सलग तीन दिवस परीक्षा न घेता सोमवारी 24 जूनला होणारा पेपर सुटीच्या दिवशी घ्यावा, अशी त्यांची विनंती होती. त्यानुसार पेपरची तारीख बदलली आहे. जयवंतराव खडताळे, उपकुलसचिव, मुक्त विद्यापीठ