आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम. ए.च्या परीक्षार्थींना पाऊण तास विलंबाने मिळाली प्रश्नपत्रिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍मक छायाचित्र
नाशिक; शहरातील महाविद्यालयांमध्ये एम.ए. अभ्यासक्रमाची परीक्षा सुरू असताना, विद्यार्थ्यांना तब्बल पाऊण तास उशिराने प्रश्नपत्रिका देण्यात अाल्या. महाविद्यालयांना विद्यापीठाकडूनच प्रश्नपत्रिका मिळाल्या नसल्याचे सांगण्यात अाले. तर, पुणे विद्यापीठाशी संवाद साधला असता, प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना दिल्या गेल्या असल्याचे सांगण्यात अाल्याने नेमका गाेंधळ कुठे झाला, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला अाहे. या गाेंधळामुळे विद्यार्थ्यांचा वेळ मात्र वाया गेला. या प्रकाराचा परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला.

या प्रकारामुळे विद्यार्थ्यांची फजिती झाल्याने नक्की चूक कोणाची, असा प्रश्न उद््भवतो. या परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे एम. ए. च्या अर्थशास्त्र, पत्रकारिता जनसंज्ञापन अशा विविध अभ्यासक्रमांची परीक्षा घेण्यात येत अाहे. विद्यार्थ्यांना ज्याचे रीतसर वेळापत्रक देण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार सकाळी १०.३० वाजता सुरू हाेणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सकाळी ११.१५ वाजता मिळाली. शिवाय, याविषयी महाविद्यालयात विचारणा केल्यावर प्रश्नपत्रिका अालेलीच नाही, असे सांगितले गेले. विद्यार्थी अस्वस्थ होऊन प्राचार्यांना भेटल्यावर त्यांनीही विद्यापीठाची चूक असल्याचे सांगितले.

घडलेल्या या प्रकारामुळे पुढील परीक्षेचे वेळापत्रक चुकण्याची शक्यता होती, हे लक्षात घेऊन विद्यापीठाशी संपर्क साधला असता प्रश्नपत्रिका वेळेवर दिल्याचे कळाले. यामुळे विद्यार्थ्यांच्या बसच्या वेळा चुकल्या. परीक्षार्थी एम.ए. अभ्यासक्रमाचे असल्याने त्यांना उत्तर देणे महाविद्यालयालाही अवघड झाले होते. अशा परिस्थितीत अगदी वार्षिक परीक्षा असली तरी विद्यार्थीच वेठीस धरले जातात. नेहमी पेपर उशिरा मिळणे, दिलेल्या वेळेपेक्षा आधी पेपर काढून घेणे असे प्रकार वेळोवेळी पाहायला मिळतात. या गोष्टींना पर्याय मिळाल्यास किती दिवस परीक्षांविषयी तक्रारी सहन करायच्या, हा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

या संदर्भात विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांना विद्यार्थ्यांच्या या तक्रारीबाबत फोन केला गेला. त्यांनी सांगितले की, महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका वेळेवर दिल्या गेल्या अाहेत. नाशिकमधून प्रश्नपत्रिका उशिरा मिळाल्या, अशा स्वरूपाची काेणतीही तक्रार अालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी महाविद्यालयात याबाबत विचारणा केली असता अवघ्या पाच मिनिटांत परीक्षार्थींच्या हातात प्रश्नपत्रिका पडल्या. मग घडलेल्या प्रकारामध्ये नक्की चूक कुणाची, असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे.