आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालगाडीचे 20 डबे घसरले, अनेक रेल्वे गाड्या रद्द

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकरोड रेल्वे स्थानकापासून सुमारे 30 कि.मी. अंतरावर असलेल्या अस्वली ते पाडळी स्थानकादरम्यान जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे कंटेनर घेऊन जाणा-या मालगाडीचे 20 डबे गुरुवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास रुळावरून घसरले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. जनशताब्दी, गोदावरी व पंचवटी एक्स्प्रेससह लांबपल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.
अपघातानंतर एका ट्रॅकवरून वाहतुक सुरू होती. जेथून गाड्या रद्द करण्यात आल्या त्या तेथूनच परतीच्या प्रवासात मात्र नियोजित वेळेत धावल्या. दुरांतो एक्स्प्रेस मुंबईकडे तर कुर्ला- वाराणसी एक्स्प्रेस भुसावळकडे एकेरी ट्रॅकवरून रवाना करण्यात आल्याचे रेल्वे विभागातर्फे सांगण्यात आले. गोदावरी एक्स्पे्रस नाशिकरोडला, तर पंचवटी मनमाडला, देवळाली- भुसावळ शटल देवळाली कॅम्प येथे रद्द करण्यात आली. औरंगाबादवरून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाडवरूनच परत पाठवण्यात आली. भुसावळ-मुंबई पॅसेंजर मनमाडवरून भुसावळकडे, तर मुंबई-भुसावळ पॅसेंजर इगतपुरीवरून मुंबईकडे रवाना करण्यात आली.
प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत
रद्द करण्यात आलेल्या गाड्यांतील प्रवाशांना तिकिटांचे एकुण 61 हजार 125 रुपये परत करण्यात आले. तर अपघातानंतर आपत्कालीन गाडी ट्रॅक दुरुस्तीसाठी नाशिक रोडवरून घटनास्थळाकडे रवाना झाली.