आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉकड्रिलमध्ये बीएसएनएल, पोलिसांचे पितळ उघडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थाच्या आपत्ती व्यवस्थापनाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत असल्याने त्याची चाचपणी करण्यासाठी शनिवारी गोदाघाटावरील रामकुंड परिसरात मॉकड्रिल करण्यात आले. मात्र, त्यात बीएसएनएलची सर्वच यंत्रणा कोलमडली. जिल्हा रुग्णालय पोलिस नियंत्रण कक्षात वेळेत फोन उचलण्यासोबतच नेमके मॉकड्रील कशाचे, याचीच माहिती पोलिसांना नसल्याने या तिन्ही विभागांचे पितळ उघडे पडले.
मॉकड्रिलनंतर नियोजन भवनात झालेल्या बैठकीत बीएसएनएलचे फोनच लागले नसल्याचे स्पष्ट झाले. अग्निशमन विभागाला मॉकड्रिलची माहितीच नव्हती. त्यांच्या दैनंदिनीत मॉकड्रिलसाठी वाहने रवाना असल्याचा उल्लेख हाेता. त्यातून त्यांचा निष्काळजीपणाच समोर असल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले.
या राहिल्या त्रुटी
स्ट्रेचर कमी होते. प्रथमोपचार दिले गेले नाही. पब्लिक अॅड्रेस सिस्टिमचे प्रशिक्षण दिले नसल्याने तिचा वापरच करता आला नाही. जिल्हा रुग्णालयात एकच टेलिफोन ऑपरेटर असल्याने फोनच उचलले गेले नाही. पोलिस नियंत्रण कक्षात फोन बराच वेळ वाजूनही प्रतिसाद मिळाला नाही. अधिकाऱ्यांचे फोन लागले नाही. पुन्हा कॉलही केले नसल्याची पालिका आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी खंत व्यक्त केली. मोबाइल नेटवर्क जॅम होते. जखमींना अॅम्ब्युलन्समध्ये टाकताना अॅम्ब्युलन्समध्ये जाऊन फोटो सेशन केले जात होते. त्यास मज्जाव करणे आवश्यक होते. कुठल्या अधिकाऱ्याला फोन करावयाचा, याचीच माहिती नव्हती.
बातम्या आणखी आहेत...