आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदन पवार आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राजस्थानसेन मारू समाजाचे अध्यक्ष मदन पवार यांच्या संशयास्पद मृत्यूबाबत पोलिसांकडून सखोल तपास केला जात नसल्याने त्यांचे कुटुंबीय समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात कुटुंबीयांनी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांची भेट घेत हा तपास भद्रकाली पोलिसांकडून गांभीर्याने केला जात नसल्याने तो सीआयडी अथवा सीबीआयमार्फत व्हावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

पवार यांचा २७ नोव्हेंबर रोजी कन्नमवार पुलाखाली संशयास्पद मृतदेह आढळला होता. याबाबत आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले की, पवार हे २५ वर्षांपासून समाजसेवा करीत होते. जमीन खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय हाेेता. त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी. याप्रसंगी भाजपचे उपाध्यक्ष महेश हिरे, अॅड. पुखराज राठोड, शांतीलाल छापरवाल, जीवन टोकस, सुरेश शिसोदे, राजेंद्र टोकस, किरण टाक, राजेंद्र टांवर, प्रताप पवार, नारायण यादव, अशोक सूर्यवंशी, अरुण सैंदाणे उपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...