आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घरोंदा’सोबत अनुभवा स्वप्नपूर्तीचा प्रवास...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पुणेस्थित प्रसिद्ध समूह ‘गार्डियन डेव्हलपर्स’च्या नाशिक शाखा कार्यालयाच्या उद‌्घाटनानिमित्ताने मनपसंत गीतांनी सजलेल्या ‘घरोंदा’ या सुगम संगीताच्या मैफिलीचे आयोजन शनिवारी (िद. ९) रात्री वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात रंगणार आहे.

आपलं हक्काचं घर असावं, हे प्रत्येक व्यक्ती-कुटुंबाचं स्वप्न. हा एक प्रवासच असतो. नव्या घरात जाण्याच्या इच्छेपासून या प्रवासाला सुरुवात होते आणि गृहप्रवेशाने त्याची पूर्ती होते. घर शोधायला निघालेल्या जोडप्याची कहाणी, त्यांची मनस्थिती, घराचा शोध घेताना त्यांनी केलेली तडजोड, घरासंबंधी जुन्या-नव्या पिढीतील भावनांचा कल्लोळ, वाडा आणि घराचा फ्लॅटपर्यंत येऊन थांबलेला प्रवास अन‌् पती-पत्नी कुटुंबीयांमध्ये होणारा संवाद अशा विविध कथा, किस्से आणि संकल्पनेतील विचारांची मालिका गुंफून या कार्यक्रमाची संहिता तयार केली आहे. आणि अनुभवांसह यासाेबत आहेत, ओठांवर गुणगुणत राहणारी हिंदी- मराठी गीतं...

विशेष म्हणजे, यातील अनेक गाणी घर घेताना आपल्या आयुष्यात येणार्‍या प्रसंगांवर आधारलेली आहेत. गायक कलाकार स्वप्नजा लेले, संदीप उबाळे, अमेय जोग हे सुमधुर आवाजात गीतांचा नजराणा सादर करणार आहेत. योगेश देशपांडे अपूर्वा मोडक यांच्या बहारदार सूत्रसंचालनाची जोड त्यास लाभणार आहे.

नाशिककरांनी अशा प्रकारच्या या अनोख्या मैफलीचा आनंद घेत ‘गार्डियन’च्या नाशिकमधील प्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहन आयाेजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नाशिक कार्यालयाचे आज उद‌्घाटन...
शनिवारी(िद. ९) सकाळी ११ वाजता ‘गार्डियन डेव्हलपर्स’च्या नाशिक कार्यालयाचे उद‌्घाटन होणार आहे. हे विभागीय कार्यालय, ऑफिस नं. टी-७, ‘एनएसबी सेंटर’, कॅनडा कॉर्नर, शरणपूररोड, नाशिक- ४२२००५ येथे आहे. हा समारंभ निमंत्रितांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९८८१३००४०५.