आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा सदस्या डोलल्या ‘घरोंदा’च्या सुरावटींवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘त्याची आणि तिची स्वप्ने सारखीच असतात, पण रोजच्या जगण्यात पारखीच असतात’ हा अनुभव प्रत्येक जण घेत असतो. पण, तो घेताना एकमेकांबद्दल आणि विशेष म्हणजे आपल्या घराबद्दल वाटणारा जिव्हाळा एकमेकांकडे व्यक्त करण्याची संधीच मिळत नाही. हीच संधी ‘मधुरिमा’च्या सदस्यांनी ‘घरोंदा’ या आगळ्यावेगळ्या गीतबहार कार्यक्रमात घेतली. गार्डियनच्या नाशिक शाखेच्या शुभारंभानिमित्त हा कार्यक्रम झाला.
‘दिव्य मराठी’च्या मधुरिमा क्लब सदस्यांसाठी ‘गार्डियन डेव्हलपर्स’च्या सहकार्याने ‘घरोंदा’ पारंपरिकच गीतेही जगण्याच्या वळणावर कशी साथ देतात, हे दाखविणारा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. मातृदिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ‘मधुरिमा’ सदस्या कुटुंबांसह यात उपस्थित होत्या. प्रारंभी ‘दिव्य मराठी’चे महाव्यवस्थापक मदनसिंह परदेशी, अॅड सेल्स उपव्यवस्थापक संतोष धाडगे, गार्डियनचे महाराष्ट्रातील सेल्स हेड कृष्णा दिवटे आणि नाशिकचे शाखा व्यवस्थापक तुषार गवळी यांच्या हस्ते कलाकार स्वप्नजा लेले, संदीप उबाळे, अमेय जोग, निवेदक योगेश देशपांडे आणि अपूर्वा मोडक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णा दिवटे यांनी गार्डियनबद्दल मनोगत व्यक्त केले. ‘मधुरिमा’ क्लब मेंबर कोअर कमिटीच्या अश्विनी जोशी यांनी मधुरिमा क्लबबद्दल माहिती दिली. यानंतर गीतप्रवास सुरू झाला.
‘घरोंदा’ कार्यक्रमाची सुरुवातच ‘या सुखांनो या’ या गीताने झाला. मग स्वप्नजा आणि अमेय यांच्या ‘सून सून सून जालीमा’ या गीताला विशेष दाद मिळाली. संदीप-स्वप्नजाच्या ‘देखो मैंने देखा है ये एक सपना’ यासह, ‘लेक लाडकी या घरची,’ ‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे,’ ‘रेशमाच्या रेघांनी’ या गीतांवर रसिकांनी ताल धरला. सध्या गाजत असलेले ‘जुळून येती रेशीमगाठी’ हे गीत उपस्थित मधुरिमांनीही गायले. ‘इत्ती सी हसी’ या गाण्याने ‘घरोदा’चा समारोप झाला.

तबल्यावर अमित कुंटे, ढोलक, ढोलकीवर केदार मोरे, ऑक्टोपॅडवर अभिजित भदे आणि सिंथेसायझरवर अमृता ठाकूर-देसाई, दर्शना जोग यांनी साथसंगत केली. शैलेश लेले यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
ढोलकीला विशेष दाद
कार्यक्रमात ढोलकीचा ताल सुरू होऊन तन..तन..तन..तन... अशी ढोलकी वाजताच प्रेक्षागारात टाळ्यांचा कडकडाट झाला. एरवी लावणी सुरू होण्या आधी जी तोडी वाजवली जाते तशीच, पण त्यात विविधता आणत केदार मोरे यांनी ढोलकीवर जी थाप मारली त्यावर रसिकांनीच ताल धरला.
बातम्या आणखी आहेत...