आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तपासणीसाठी ‘मॅगी’चे नमुने एनएबीएल लॅबकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मॅगीनूडल्स मध्ये प्रमाणापेक्षा १७ पटींनी जास्त मोनोसोडियम ग्लुटामेट शिसे आढळून आल्याने त्याच्या विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अन्न आैषध प्रशासनाच्या वतीने (एफडीए) शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणांवरून मॅगी नूडल्सचे नमुने घेऊन ‘एनएबीएल’कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
शहरातील नामांकित व्यावसायिकांनी आपल्याकडील मॅगी न्यूडल्सचा साठा मुख्य वितरकाकडे पाठविला आहे. जिल्हा अन्न औषध विभागाच्या वतीने शहरातील काही ठिकाणी भेट देऊन मॅगीचे नमुने घेण्यात आले आहे. हे नमुने एनएबीएल या लॅबकडे पाठविण्यात आले असून, त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने शहरभरातील मॅगी व्यावसायिकांवर कारवाई केली जाणार आहे. देशभरात सुरू असलेल्या मॅगी नूडल्स प्रकरणामुळे शहरातील व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे.