आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा महाराज नवरात्रीत आगीत नृत्य करतो, चालतोही, पण ही श्रद्धा की अंधश्रद्धा....

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( चुंग्या महाराज) नवरात्रीत महाकालीच्या वेशभूषेत धगधगत्या आगीवर चालताना व नृत्य करताना.... - Divya Marathi
( चुंग्या महाराज) नवरात्रीत महाकालीच्या वेशभूषेत धगधगत्या आगीवर चालताना व नृत्य करताना....
नवापूर- नवापूर शहरातील महादेव गल्लीतील कल्पेश प्रकाश राठोड ( चुंग्या महाराज) गेल्या तीन वर्षांपासून नवरात्र उत्सवादरम्यान माता महाकालीची वेशभूषा धारण करून धगधगत्या आगीवर चालणे व नृत्य करणे असे प्रकार करतो. आजच्या 21 व्या शतकातील विज्ञान युगातही हा प्रकार सुरू असल्याने ही श्रद्धा की अंधश्रद्धा असा सवाल उपस्थित केला जात आहे. 
 
भगत कल्पेश राठोड म्हणतो, मला माता महाकाली आदेश देते. त्यानुसारच मी नवरात्रीत अग्निपरीक्षा देतो. भगत राठोड जेव्हा धगधगत्या आगीवर चालतो व हवेत तलवार फिरवतो हे पाहून लहान मुलांसह महिला भयभीत होत आहेत. मात्र, भगतची ही अग्निपरीक्षा पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करत आहेत. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, नवरात्रीत महाकालीच्या वेशभूषेत कसा करतो नृत्य....
बातम्या आणखी आहेत...