आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त कुंभमेळा: साध्वीचा आखाडा परिषदेच्या अध्यक्षांवर विनयभंगाचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला  समान अधिकाराची मागणी करताना साध्वी त्रिकाल  भवंती - Divya Marathi
कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला समान अधिकाराची मागणी करताना साध्वी त्रिकाल भवंती
नाशिक - सिंहस्थ कुंभमेळा सुरु होऊन दुसर्‍याच दिवशी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. साध्वींच्या आखाड्याला समान अधिकार देण्याच्या मागणीवर अडून बसलेल्या 'परी आखाडा'च्या पीठाधीश्वर त्रिकाल भवंता यांनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्या‍वर विनयभंगाचा आरोप केला आहे. महंत ग्यानदास यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही साध्वी त्रिकाल भवंता यांनी म्हटले आहे.

'माझ्या जीवाला धोका आहे, ग्यानदास यांच्याकडूनच माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे,' असा आरोप देखील साध्वी त्रिकाल भवंता यांनी केला असून पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.
मिळालेली माहिती अशी की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरिष महाजन यांच्या उपस्थितीत मंगळवारी कुंभमेळ्याचे ध्वजारोहण झाले. यावेळी साध्वी त्रिकाल भवंता आणि महंत ग्यानदास यांच्या कडाक्याचा वाद झाला होता. या कार्यक्रमात ग्यानदास यांनी महिलांशी असभ्य वर्तन केले. तसेच कार्यक्रमावेळी झालेल्या धक्काबुक्काला तेच जबाबदार असल्याचा आरोप साध्वी ‍त्रिकाल भवंती यांनी केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, काय म्हणाल्या साध्वी ‍त्रिकाल भवंती...