आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवलती लुबाडणाऱ्या बाेगस अादिवासींविराेधात कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अादिवासींच्यानावाचा गैरफायदा घेऊन अादिवासींच्या सवलती लुबाडणाऱ्या बाेगस अादिवासी जातींचा अादिवासींच्या यादीत समावेश करण्यासाठी सध्या सर्वत्र प्रयत्न सुरू अाहे. हा प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करून कारवाई केली जाईल. रविवारी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य अादिवासी बचाव अभियान अायाेजित गुणगाैरव साेहळ्यात अादिवासी विकासमंत्री विष्णू सावरा बाेलत हाेते.
याप्रसंगी ते म्हणाले की, अादिवासी समाज विकसित समाजाला अापल्या चालीरिती, कलाकाैशल्य, नैसर्गिक संपदा बहाल करून स्वत मात्र उपाशीपाेटी झाेपत अाहे. अागामी काळात अादिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार अाहे. अादिवासी जागरूक हाेण्यास अाता सुरुवात झाली अाहे. अादिवासी विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवण्याचे प्रकार समाेर येत असून, यात मी स्वत लक्ष घालून सर्व अादिवासी विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालये, वसतिगृह अाणि अाश्रमशाळेत प्रवेश मिळवून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तळपे, एकलव्य परिषदेचे अध्यक्ष के. के. साेनवणे, िजल्हा परिषद सदस्य तुळशीराम गावित, मनपा शिक्षण समिती उपसभापती गणेश चव्हाण, नगरसेविका रंजना भानसी, प्रा. अशाेक बागुल, महादेव काेळी संघाचे अध्यक्ष कैलास शार्दूल, भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी उपस्थित हाेते.
सावरा म्हणाले की, विधानसभेत अादिवासी अामदारांच्या २८ जागा राखीव असून, या जागांवरदेखील राज्यातील इतर जातींच्या नेत्यांचा डाेळा अाहे. मात्र, त्यांची ही घुसखाेरी कधीही मान्य केली जाणार नाही. जागतिक अादिवासी दिनानिमित्ताने सर्व जगाला अादिवासींची ताकद खऱ्या अर्थाने समजली अाहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाण म्हणाले, अादिवासींमध्ये इतर जातींची घुसखाेरी हाेणार नाही, यासाठी सर्व राज्यातील अादिवासी खासदार एकत्र अाले असून, दिल्ली येथे याबाबत नुकतीच बैठक घेण्यात अाली अाहे. असा प्रयत्न झाल्यास अाम्ही गप्प बसणार नाही असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अाणि अाभार प्रा. अशाेक बागुल यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हाभरातील विविध अाश्रमशाळेचे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी उपस्थित हाेते.

या विद्यार्थ्यांचा गाैरव
साेहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी, बारावी अाणि चाैथी सातवी स्काॅलरशिपमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गाैरव करण्यात अाला. यात कविता भाेये, गिरीश भाेये, अंकिता भाेये, राहुल चाैधरी, दीपक गायकवाड, तेजल गवंदी, मनीषा गायकवाड, गाैतमी ठाकरे यांचा समावेश हाेता.

जागतिक अादिवासी गाैरव दिनानिमित्त अादिवासी बचाव अभियानातर्फे अार. पी. विद्यालय पंचवटी येथून शाेभायात्रा काढण्यात अाली. संजयनगर, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, रेडक्राॅस सिग्नलमार्गे परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे शाेभायात्रेचा समाराेप झाला. शाेभायात्रेत अादिवासी तरुण-तरुणींनी सादर केलेल्या नृत्यातून अादिवासी संस्कृतीचे नाशिककरांना दर्शन झाले.