आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Elections, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मल्टिप्लेक्स, बँकांत होणार मतदान जागृती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- लोकसभा निवडणुकीत ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत मतदारांमध्ये जागृती झाल्याने आता विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती प्रशासनाकडून केली जात आहे. प्रशासनातर्फे ते १४ ऑक्टोबरदरम्यान बँक, मल्टिप्लेक्स, बसस्थानके, पेट्रोलपंपांवर जनजागृतीपर पोस्टर्स लावले जाणार असून, एटीएममध्ये थेट दररोज मतदानासाठी किती दिवस शिल्लक राहिले याची आठवण करून देण्यासाठी काउंटडाउन स्वरूपातच माहिती प्रसिद्ध करीत मतदान करण्यासाठी आवाहन केले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत स्वतंत्र जागृती निरीक्षकांची आयोगाने नेमणूक करत प्रत्येक जिल्ह्यात आणि मतदारसंघात कशा पद्धतीने मतदारांमध्ये जागृती केली जात आहे, हे तपासून पाहिले. त्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीत आयोगाकडून मतदारांमध्ये विशेष जागृती होत नसल्याचा आरोप होत असतानाच आता जागृतीसाठी प्रशासनातर्फे ‘स्वीप’ उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामध्ये मतदारांना मतदानाचे आवाहन करणारे पोस्टर्स, बॅनर्स, भित्तिपत्रके गर्दीच्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. सिनेमागृहांमध्ये ३० सेकंदांची जाहिरात दाखविली जाणार आहे. त्याचबरोबर एटीएममध्ये काउंटडाउन, तर बँकेत पोस्टर्स लावले जातील. ग्रामीण भागात ग्रामसेवक, कृषी सहायक, अंगणवाडी सेविका, शाळेचे मुख्याध्यापक गावात फिरून मतदान करण्यासाठी आवाहन करणार आहेत. ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयासह गावातील सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्धिपत्रकांमार्फत मतदारांना आवाहन करत शंभर टक्के मतदान करण्याचा मानस जिल्हा निवडणूक शाखेने व्यक्त केला आहे.