आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Polls: Shiv Sena And BJP Seat sharing

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निम्म्या जागा हव्यात ही भाजपची मागणी रास्तच, दानवे यांच्या भूमिकेमुळे वादात ‘तेल’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस एकीकडे शिवसेनेकडे विधानसभेच्या निम्म्या म्हणजे १४४ जागा मागितल्याच नसल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे याच पक्षाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मात्र निम्म्या जागांची भाजपची मागणी रास्तच असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे वरवर भाजप मवाळ भूमिका घेत असल्याचे दाखवत असला, तरी १४४ जागांच्या मागणीवर केंद्रीय पातळीवरून दबावतंत्राचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उघड होते.

राज्यात शिवसेनेने नेहमीच आपल्या ताकदीनुसार मोठ्या भावाची भूमिका बजावत विधानसभेत जादा जागा लढवल्या आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत चित्र बदलले असून आता भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे विधानसभेत कमी जागा लढवण्याचा प्रश्नच नसून निम्म्या-निम्म्या जागा लढवण्याची भाजप नेत्यांची भूमिका रास्तच असल्याचा पुनरुच्चार दानवे यांनी बुधवारी नाशिकमध्ये केला.

लोकसभेत भाजपला देशभर भरघोस यश मिळाल्यानंतर आता राज्यातही मोदी फॅक्टर प्रभावी ठरण्याचा आशावाद भाजपच्या नेत्यांना आला आहे. त्यामुळे कमी जागा लढवण्यात पक्षाचे नुकसान आहे. म्हणून महायुतीत सन्मानपूर्वक निम्म्या जागा भाजपला मिळायलाच हव्यात, असे मतही दानवेंनी व्यक्त केले.

शिवसेना मात्र त्या देण्यास तयार नसल्याने जागा वाटपाचे घोंगडे भिजत पडल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपच्या वाढीव जागांच्या मागणीला शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. याच वादामुळे महायुतीचे जागावाटपही रखडले आहे. शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांनी समन्वयातून मार्ग काढावा, अशी मागणी इतर छोटे घटकपक्ष करत असताना भाजपचे नेते मात्र आपली मागणी रेटून मांडत आहेत.
युती तुटणार नाहीच
एकीकडे शिवसेनेचा विरोध असतानाही निम्म्या जागा मागणीचे समर्थन करणाऱ्या दानवेंनी दुसरीकडे मात्र जागावाटपावरून महायुतीत कुठलाही ताणतणाव येणार नाही किंवा येऊ देणार नसल्याचे सांगितले. काहीही झाले तरी भाजप-शिवसेना एकत्रच विधानसभा निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुढील स्लाइडमध्ये, ‘आम्ही नाही, मुख्यमंत्री चव्हाण दडपणाखाली’