आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभरावर ‘अभियांत्रिकीं ’त हाेणार उद्याेजकतेचा जागर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र चेंबर आॅफ काॅमर्स इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चर आणि ‘दिव्य मराठी’ने संयुक्तरीत्या सुरू केलेला ‘स्वप्न उद्याेजकतेचे’ हा उपक्रम आता शासनामार्फत राज्यभरात पाेहाेचणार आहे. नाेकरीच्या मागे न लागता तरुणांनी स्वत:चा उद्याेग-व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा देणारा हा उपक्रम असून त्याचा फायदा आतापर्यंत हजाराे तरुणांनी घेतला आहे. या उपक्रमाचे स्वरूप शासनातर्फे अधिक व्यापक हाेणार असून राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीने ताे राज्यातील शंभरावर अभियांत्रिकी महाविद्यालयांत आयाेजित केला जाणार आहे.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या आैचित्याने १२ जानेवारी २०१५ ‘युवा दिनापासून महाराष्ट्र चेंबर आॅफ काॅमर्सकडून ‘स्वप्न उद्याेजकतेचे’ या कार्यशाळेचा उपक्रम सुरू करण्यात आला. ‘दिव्य मराठी’ या उपक्रमाकरिता माध्यम सहयाेगी म्हणून भूमिका पार पाडत आहे. नाशिक, आैरंगाबाद, धुळे, कळवण या शहरांत कार्यशाळा झाल्या असून त्याला युवक, महिला, विद्यार्थी यांनी माेठ्या संख्येने सहभाग नाेंदवला आहे. उद्याेजकता अंगी बाणवण्यासाठी या कार्यक्रमामुळे आपला आत्मविश्वास वाढल्याचे सांगितले आहे.

शिक्षणमंत्र्यांसमाेर सादरीकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेक इन महाराष्ट्र’ चा नारा दिला असून प्रशासनाचीही पावले आता त्याच दिशेने पडत आहेत. ‘मेक इन महाराष्ट्र’चे ध्येय डाेळ्यासमाेर ठेवूनच महाराष्ट्र चेंबरकडून या उपक्रमाची आखणी केली असून राज्यभरात हा उपक्रम पाेहाेचावा याचे सादरीकरण शालेय शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांच्यासमाेर करण्यात आले. त्यानंतर त्यांनी हा उपक्रम शंभर महाविद्यालयांत राबवण्याबाबत अधिकार्‍यांना आदेश दिले असून लवकरच याची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिसून येईल. - नेहा खरे, चेअरपर्सन, महाराष्ट्र चेंबर युवा उद्याेग समिती
बातम्या आणखी आहेत...