आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Chamber Of Commerce, Industry And Agriculture Of Women Committee Program

महिला उद्योजिकांसाठी लवकरच नवे धोरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ज्या-ज्याक्षेत्रात महिला पुढे येतील, त्या-त्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम राज्य सरकार करत असून, महिला उद्योजिकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी लवकरच स्वतंत्र ‘महिला औद्योगिक धोरण’ आणले जाणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विविध योजना सवलतींचा या धोरणात समावेश असेल आणि याच धोरणाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स आणि किरकोळ व्यापार यासाठीही वेगळे धोरण अमलात येणार आ हे. त्याची कामे सध्या शासकीय पातळीवर सुरू असल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चरच्या महिला समितीतर्फे चोपडा लॉन्स येथे भरविण्यात आ लेल्या ‘प्रेरणा २०१६’ या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात देसाई बोलत होते. व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, धावपटू कविता राऊत, चेंबरचे अध्यक्ष शंतनू भडकमकर, वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष विलास शिराेरे, माजी अध्यक्ष खुशाल पोद्दार, विक्रम सारडा, दिग्विजय कापडिया, ‘प्रेरणा’च्या समन्वयिका प्रज्ञा पाटील, सोनल दगडे आ दी उपस्थित होते.
उद्योग, व्यवसाय, राजकारण, बँकिंग अशा विविध क्षेत्रांत महिला अनेक महत्त्वाची पदे भूषवित असल्याचे सांगून निर्यातीत सर्वाधिक वाटा असलेल्या लघुउद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला उतरत आ हेत. सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करणाऱ्या महिलांमध्ये जिद्द, चिकाटी असे अनेक गुण आ होत. महिला उद्योजकांच्या प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाचे प्रयत्न जोरकसपणे सुरू आ हेत. महिला उद्योजिकांसाठी औरंगाबादमध्ये रबर क्लस्टर उभारण्यात आ ले असून, चाकण (पुणे) येथे भूखंड देण्याचा निर्णय घेतला आ हे याकडे त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष शंतनू भडकमकर, उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी या प्रदर्शनामागील उद्देश स्पष्ट करत चेंबर विविध पातळ्यांवर करत असलेल्या कामांची माहिती दिली. महिला उद्योजिकांसाठी औद्योगिक वसाहतीत गाळे उपलब्ध करून देण्याची, तसेच महिला उद्योजिकांच्या क्लस्टरसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रज्ञा पाटील यांनी केली. या कार्यक्रमास निमा, आ यमाच्या पदाधिकाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते.

महिला उद्योजिकांसाठी शहरात भूखंड मंजूर
नाशिकमध्येचेंबरकडून महिला उद्योजिकांकडून क्लस्टरकरिता भूखंडाची मागणी लक्षात घेता असा भूखंड देण्यास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंजुरी देत असल्याची घोषणा केली. याशविाय नाशिकमध्येच कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक केंद्राची उभारणी होणार असून, लवकरच त्याचे भूमिपूजनही होईल, असे सांगतानाच या प्रकल्पाकरिता शासनाने निधीही राखून ठेवला असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.