आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरमध्ये बोगस मतदान, नाशिकमध्ये बोगस मतदार पोलीसांच्या ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/नागपूर- राज्यात दुसऱ्या टप्प्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी मदतान सुरू असतांना काही ठिकाणी बोगस मतदान करणाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.  नाशिकमधील अंबड भागात काही लोंकांना ताब्यात घेण्यात आले असून नागपूरमध्ये बोगस मतदानाचे प्रकार घडले आहेत.

नाशिकमधील अबंडच्या जनता विद्यालयात बोगस मतदानाचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीसांना काही लोकाना ताब्यात घेतले आहे. हे मतदार मिनी ट्रकमधून मतदानाला जात असतांना पोलीसांनी ही करवाई केली आहे. दुसरीकडे नाशिकमधीलच एका मतदान केंद्रावरील इव्हिएम मशिनमध्ये बिघाड झाला होता त्यामुळे काही वेळासाठी मतदान थांबले होते. परंतु, दुरूस्तीनंतर पुन्हा मतदानाला सुरळीत सुरुवात झाली आहे.

नागपूरमध्येही बोगस मतदानाचा प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक 38 मधील येशोदा नगरातील शाळेमध्ये बोगस मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. मतदार मतदानासाठी गेले तेव्हा त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे त्यांना कळाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...