आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Engineering Research Institute In Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्जन्य, भूकंप व भूजल परीक्षण एकाच छताखाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्यातील अतिवृष्टी आणि अवर्षण, त्यामुळे पडणारा ओला व कोरडा दुष्काळ, भूकंपांबाबतचे पूर्वानुमान आणि त्या धक्क्यांचे मापन, शेतकर्‍यांना उपयुक्त ठरणारे माती व पाणी परीक्षण याबाबत अचूक, तत्काळ माहिती एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी व अचूक अंदाजांबाबतचे ‘व्हिजन २०२०’ साध्य करण्यासाठी जलसंपदा विभागाने एक एप्रिलपासून महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन केंद्र (मेरी), महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी आणि मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (सीडीओ) ही कार्यालये प्रशासकीय पुनर्रचना करून एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्जन्य, भूकंप व भूजल परीक्षण आता एकाच छताखाली होणार असून नागरिकांना व शेतकर्‍यांना अचूक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध
होण्यास मदत होईल.

नाशिक येथील मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन केंद्र आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी या कार्यालयांतर्गत माती, दगडांच्या धरणांची रचना,धरण सुरक्षितता, जलगती संशोधन, भूकंप उपकरणे कक्ष व भूकंप आधार सामग्री पृथ:करण, संरचनात्मक संशोधन व पदार्थ विज्ञान, गाळ सर्वेक्षण, सुदूर संवेदन व भूमाहिती शास्त्र, सामग्री चाचणी व माती चाचणी, उपकरणे संशोधन, आधार सामग्री पृथ:करण, जलनियोजन असे वेगवेगळे विभाग येतात.
या विभागांची संख्या जास्त असल्याने कामकाजात अधिक सुसूत्रता येण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी एक वर्षापूर्वी औरंगाबाद येथे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आठ समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ठराविक अधिकार्‍यांकडे जास्त विभाग असल्याने कामात सुसूत्रता येत नसल्याचे, तर काही अधिकार्‍यांकडे केवळ दोनच विभाग असल्याने त्यांच्याकडे कामच नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्वांना समान आणि गुणवत्तापूर्ण कामाची जबाबदारी निर्गमित करण्यासाठी प्रशासकीयदृष्ट्या स्वतंत्र असलेले विभाग एकत्रित करण्यात आले आहेत.

अशी असतील नवीन विभागांची कामे
मुख्य अभियंता मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना
मऊ पायारचनेची बँरेजेस, बरेजवरील प्रीस्टेस्ड, बंदिस्त नलिका वितरण, सूक्ष्म सिंचन, जल आयोग व इतर राज्यांमधील संकल्पचित्र संघटनांशी समन्वय.

नियोजन व जलविज्ञान गणितीय प्रतिकृती, सर्ज अ‍ॅनॉलिसिस, वॉटर हॅमर इफेक्ट, प्लड झोनिंग, बॅक वॉटर स्टडी, जलनियोजन, हवामान बदलाचे सिंचन प्रकल्पावर होणारे परिणामाचा अभ्यास.

महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी
प्रशिक्षणासोबत प्रत्यक्ष क्षेत्रावर अधिक भर, मेरी सीडीओ धरण सुरक्षा या कार्यालयांकडून विकसित कार्यपद्धती क्षेत्रीय अभियंत्यापर्यंत पोहोचवणे, अभियंत्यांना उद्दिष्टे साध्य करण्यास तांत्रिक मदत.

कामकाजास गती प्राप्त होईल
शासनाचा हा सकारात्मक निर्णय असून त्यामुळे कामकाजास गती प्राप्त होऊन त्याचा नागरिकांना लाभ होईल. अधिकार्‍यांना समान कामाचे वाटप होणार असून त्यामुळे तणाव कमी होईल.- आर. व्ही. श्रीगिरीवार, अधीक्षक अभियंता मेरी