आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र 70 टक्के भारनियमनमुक्त - प्रभाकर शिंदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - महाराष्ट्र 70 टक्के भारनियमनमुक्त झाला असून उर्वरित ठिकाणी वीजगळती कमी झाल्यानंतर तेथे भारनियमनमुक्त गाव करण्याचा महावितरण कंपनीचा प्रयत्न असल्याचे नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे रोटरी क्लब हॉलमध्ये वीज कर्मचार्‍यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
नैसर्गिक आपत्तीप्रसंगी काम करणार्‍या कामगारांनी सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी, असे सांगून शिंदे म्हणाले की, कामगारांच्या वारसांना वीजसेवक म्हणून काम दिले असून, पुढील काळात वीजसहायकांची भरती करण्यात येणार आहे. फेब्रुवारी 2013 मध्ये नाशिकमध्ये संघटनेचे महाअधिवेशन होणार असल्याचे संघटनेचे केंद्रीय सल्लागार अरुण भालेराव यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानी कंपनीचे विभागीय अध्यक्ष विनोद कोपरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महापारेषणचे मुख्य अभियंता एम. एल. सानप, स्वतंत्र मजदूर युनियनचे अध्यक्ष जे. एस. पाटील, संघटनेचे केंद्रीय सल्लागार अरुण भालेराव, कार्यकारी अभियंता सोनुले उपस्थित होते. यावेळी परेश पवार, राजा बोढारे, के. एस. इंगळे, आकाश तायडे उपस्थित होते.