आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेकडून स्थायी समितीमध्ये अाैटघटकेसाठी खांदेपालट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेचा पंचवार्षिक कार्यकाळ संपण्यास जेमतेम काही महिने बाकी असताना मनसेने दाेन सदस्यांचे राजीनामे घेतले असून, अाता त्यांच्या जागेवर वर्णी लागण्यासाठी मनसेत पुन्हा एकदा नगरसेवकांची धडपड सुरू झाली अाहे. मनसे एेनभरात असताना प्रत्येकवर्षी पाच नगरसेवकांना स्थायी समितीवर स्थान देण्याचे धाेरण ठरले हाेते. मात्र, विद्यमान महापाैर अशाेक मुर्तडक यांना पहिल्या वर्षी स्थायी समिती सभापती करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी त्यांना स्थायी समितीवर सदस्यपद दिले गेले. त्यानंतर साेयी-साेयीने धाेरणात बदल झाल्यामुळे स्थायी समिती सदस्य हाेण्याचे सर्वच सदस्यांचे स्वप्न पूर्ण हाेणे अवघड दिसत हाेते. त्यात तिसऱ्या वर्षानंतर लाेकसभा विधानसभा निवडणुकीत पक्षाचे पानिपत झाल्याने अनेक नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केला.
सद्यस्थितीत पदे असली तरी नगरसेवक शाेधून वर्णी लावण्यासाठी मनसेची धडपड अाहे. काही ठिकाणी नगरसेवक थाेपवून धरण्यासाठी इच्छा नसतानाही पदे द्यावी लागत असल्याचे चित्र अाहे. त्याचाच एक भाग म्हणून अाता निवडणुकीच्या ताेंडावर स्थायीच्या दाेन सदस्यांचे खांदेपालट केले असून, सभागृहनेतेपदी सुरेखा भाेसले यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा स्थायी समितीचा राजीनामा मंजूर झाला अाहे. तर मेघा साळवे यांना मात्र काहीच कारण नसताना अचानक ब्रेक दिल्याने पक्षात उलटसुलट चर्चा सुरू अाहे. या दाेन्ही पदांसाठी अाता अर्चना जाधव, सुमन अाेहाेळ, गणेश चव्हाण, सुजाता डेरे, डाॅ. विशाल घाेलप अशी नावे चर्चेत अाली असून, यातून काेणतेही दाेन सदस्य निवडल्यानंतर पदरात येणारी नाराजी बघता पक्षाने राजीनाम्यातून काय साधले? असाही सवाल केला जात अाहे.

मनसेतील बंडाळी वाढणार
अाधीचमाेठ्या प्रमाणात नगरसेवकांनी शिवसेना भाजपची वाट धरल्यामुळे मनसेला पडलेले खिंडार बुजत नसताना त्यात वाढ हाेण्याचेच प्रकार वाढत असल्याचेच चित्र अाहे. स्थायी समितीवर साळवे भाेसले यांचे राजीनामे घेण्यामागे अंतर्गत वादाचे प्रमुख कारण सांगितले जाते. याउलट दाेन वर्षांचा कार्यकाळ असलेल्या यशवंत निकुळे हे स्थायीवर कायम असल्यामुळे त्यात तथ्य असल्याचेही चित्र अाहे. त्यामुळे येत्या काही काळात पुन्हा बंडाळी उद‌्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात अाहे.
बातम्या आणखी आहेत...