आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena Supremo Raj Organise Get Together

मनसेतील ‘जवळच्यां’साठी राज ठाकरे यांचे मुंबईत गेट टुगेदर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी हिला शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच ठाकरे कुटुंबीयांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन िवघ्नहर्त्याचे दर्शन घेतले. छाया : संदीप महाकाल
नाशिक - विधानसभा निवडणुकीत पक्षाची झालेली वाताहत व त्यानंतरचे प्रमुख पदाधिका-यांचे राजीनामासत्र पाहता नाराजांमुळे गळती रोखण्यासाठी व पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी आता पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भावनिक रणनीतीचे अस्त्र उपसल्याचे चित्र आहे. म्हणूनच की काय, मुंबईत १० नोव्हेंबरला राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोट ‘गेट टुगेदर’च्या निमित्ताने बांधण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, फक्त ‘जवळच्यांनाच’ बोलावले, असे सांगत प्रत्येकाला त्यासाठी आमंत्रण दिले जात आहे.

विधानसभा निवडणुकीत मनसेचा सुपडा साफ झाल्यानंतर राज यांना मोठ्या प्रमाणावर पक्षांतर्गत कलहाचा सामना करावा लागला. त्यातच नाशिक, जळगाव येथे पदाधिका-यांनी मोठ्या प्रमाणावर राजीनामे दिले. अशा प्रतिकूल परिस्थितीत राज यांनी तीन दिवसांपूर्वी नाराजांना झटका देण्यासाठी ‘या अडचणीच्या स्थितीत माझ्यासोबत कोण-कोण हे कळेल’ असे सांगत सर्वांचेच राजीनामे मंजूर केले. त्यांच्या या भावनिक वक्तव्याचा मनसेतील नाराजांवर परिणाम होऊन ते संघटनेच्या पुन्हा जवळ आल्याचे चित्र निर्माण झाले. बंडाच्या तयारीत असलेल्या नाशकातील काही नगरसेवक व पदाधिका-यांनी त्यामुळे तलवारी म्यान केल्या. आता या भावनिक खेळीचे पुढचे पाऊल म्हणून राज्यभरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राज यांच्याशी हितगुज साधण्यासाठी मुंबईत बोलावले जाणार आहे. ‘गेट टुगेदर’च्या माध्यमातून मनसेतील अंतर्गत दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दोन वर्षांवर आलेल्या महापालिका निवडणुकीसाठी पक्षामध्ये पुन्हा चैतन्य फुंकण्याचाही प्रयत्न या मेळाव्यातून होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

... अन्यथा पुन्हा दौरा
सूत्रांच्या म्हणण्याप्रमाणे, सर्वांनी एकत्र येण्याची कल्पना मनसेतील प्रदेशस्तरावरील काही पदाधिका-यांची आहे. त्यासाठी १० नोव्हेंबरची तारीख दिली जात असली तरी अद्याप ती निश्चित नाही. तयारी, जमवाजमव योग्य पद्धतीने झाली, तरच हे ‘गेट टुगेदर’ होईल, अन्यथा राज ठाकरे हे १४ नोव्हेंबरपासून पुन्हा महाराष्ट्र दौ-यावर निघणार आहेत. त्या वेळी मात्र ते प्रत्येकाशी वैयक्तिक बोलून त्यांच्या मनातील रुसवा, नाराजी दूर करतील, असे सांगण्यात येते.