आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - माजी आमदार वसंत गिते यांनी मनसे सोडल्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर मनसेच्या त्र्यंबकेश्वर येथील नवनिर्वाचित विद्यमान नगराध्यक्षा अनघा फडकेंसह मनसेचे सहा विद्यमान नगरसेवक आणि शहराध्यक्षांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपात प्रवेश केला. जिल्ह्यातील मनसेचे इतर पदाधिकारीही भाजपच्या संपर्कात असल्याचे सूतोवाच वसंत गिते यांनी केल्याने आता मनसेचा पूर्ण किल्लाच ढासळतो की काय, अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

चार महिन्यांपूर्वी माजी आमदार वसंत गिते यांनी मनसेतून भाजपात प्रवेश केला. लागलीच जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांनीही प्रवेश केल्याने मनसेला पुरती गळती लागली. त्यातच कॅन्टाेमेंटच्या निवडणुकीतही मनसेला शह देत भाजपने उपाध्यक्षपद राखले. त्यानंतर मनसे-भाजप राजकीय द्वंद्व थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच शुक्रवारी अचानक पूर्वीचे मनसे नगरसेवक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या विद्यमान नगराध्यक्षा अनघा फडके यांनी भाजप शहर कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यांच्यासोबत सहा नगरसेवकांनीही मनसेला रामराम केला. मनसे शहराध्यक्ष, उपाध्यक्षांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे आता नाशिकमध्ये काहीशा कमकुवत झालेल्या मनसेला आता ग्रामीण भागातही सुरुंग लागल्याचे िदसते. दुसरीकडे महाजन यांनीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांखेरीज सर्वांना भाजपची दारे खुली असल्याचे जाहीर करत भाजपमध्ये प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे. शिवाय राजकारणात प्रत्येक दिवस सारखाच असतो असे नाही. कॉँग्रेसची आणि राज्यात मनसेची झालेली वाताहत हे त्याचे उत्तम उदाहरण अाहे. कुठल्याही स्थितीत टिकायचे असेल तर पक्षसंघटन तळागाळात मजबूत करणे आवश्यक असल्याचेही महाजन यांनी स्पष्ट करत नव्या-जुन्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षसंघटन मजबुतीसाठी कार्यरत राहण्याचा सल्ला दिला.

या वेळी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी स्वत:चाच विचार करता देशाचा, पक्षाचा विचार करण्याची अपेक्षा व्यक्त केली. वसंत गिते यांनीही पक्षापेक्षा कोणीही मोठा नसतो. त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध राहणारी आम्ही माणसे असून, तळागाळात पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचे अाश्वासन दिले. या वेळी माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप उपस्थित होते.

यांचा झाला प्रवेश
नगराध्यक्षाअनघा फडके, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक योगेश तुंगार, यशोदा अडसरे, धनंजय तुंगार, नगरसेविका विजया लढ्ढा, अाशा झोंबाड, नगरसेवक यशवंत भोये, अभिजित काण्णव, मनसे शहराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक मनोज थेटे, उपाध्यक्ष सुयोग नार्वेकर, राहुल फडके, चेतन थेटे, दीपक लढ्ढा, छायाचित्रकार सचिन निरंतर, वाघेराचे सरपंच जयराम मुंड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या नूतन नगराध्यक्षा अनघा फडकेंसह सहा नगरसेवकांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

अधिकमासात माहेरी आल्याचे समाधान
पूर्वीचे आम्ही भाजपश्रमीच आहोत. परंतु, मध्यंतरी भरकटलो. इतर पक्षात गेलो. पण, आता मात्र वसंत गितेंच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वगृही परतलो आहोत. अधिक महिन्यात माहेरी आल्याचेच आता समाधान मिळत असून, नगराध्यक्षपद हे अधिक महिन्याचे वाणच तुम्ही दिले आहे. -अनघा फडके, नगराध्यक्षा, त्र्यंबकेश्वर

पक्षात जुना-नवा भेद नाही : पालकमंत्री
भाजपचीदारे सर्वांसाठीच खुली आहेत. शिवाय पक्षात जुना कार्यकर्ता किंवा नवा असा कुठलाही भेद नाही. तर जुन्यांनीही नवीन येणाऱ्यांना प्रोत्साहन देत उगाचच त्यांच्यामुळे आपली अडचण होईल, असा विचार करता कुठलाही अंतर्गत कलह निर्माण करू नये, असा सल्ला जाहीरपणे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वर नगराध्यक्ष-नगरसेवकांच्या प्रवेश सोहळ्यावेळी दिला.
बातम्या आणखी आहेत...