आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Vidyarthi Sena Strike For Scholarship

शिष्यवृत्तीसाठी ‘मनविसे’चा ‘समाजकल्याण’मध्ये ठिय्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक - बी. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, एम. एस्सी. कॉम्प्युटर सायन्स बायोटेक या शाखांसाठी शासनाने शिष्यवृत्ती रद्द केलेली आहे. मात्र, यासंदर्भात विद्यार्थी अनभिज्ञ असून, त्यांना महाविद्यालयीन शुल्क भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात शनिवारी (दि. ७) ठिय्या आंदोलन करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी समाजकल्याण विभागाने याबद्दल तोडगा काढावा, तसेच रद्द करण्यात आलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी आदी मागण्यांचे निवेदन मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोरडे, उमेश भोई आदींनी सहायक आयुक्त वंदना कोचुरे यांना दिले .
शिष्यवृत्ती रद्दबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही कल्पना महाविद्यालयांकडून देण्यात आलेली नव्हती. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी असताना संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. या प्रकाराविरोधात मनविसे बिटको महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदालेनात मनविसेचे उमेश भोई, कौशल पाटील, भारती माळी, नवनाथ जेजुरकर, भाग्यश्री इंगळे आदी सहभागी झाले होते.

समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात शनिवारी शिष्यवृत्तीसंदर्भात ठिय्या आंदोलन करताना ‘मनविसे’चे पदाधिकारी आणि विद्यार्थी.

सामाजिक न्यायमंत्र्यांची भेट घेणार
रद्दकरण्यात आलेल्या शिष्यवृत्तीमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय हाेत असल्याने या प्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मनविसेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे लवकरच सामाजिक न्यायमंत्र्यांची भेट घेणार आहे. -प्रकाशकोरडे, जिल्हाध्यक्ष,मनविसे