आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirnan Sena Jilha Parishad Election

मनसेने केली 75 इच्छुक उमेदवारांची चाचपणी; 22 ला पहिली यादी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 51 गटातील 75 उमेदवारांची चाचपणी केली. 92 गणातून 140 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मनसेची पहिली यादी 22 जानेवारीला जाहीर होणार आहे.
मनसेचे प्रदेश चिटणीस तथा आमदार वसंत गिते, आमदार नितीन भोसले, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे, प्रकाश दायमा, मनसे नेते राजाभाऊ डोखळे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून इच्छुकांनी गर्दी केल्यामुळे त्र्यंबक नाक्यावरील राजगड कार्यालय फुलून गेले होते. मनसे प्रथमच जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वशक्तीनिशी उतरत असल्यामुळे इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती.
दरम्यान जात पडताळणी प्रमाणपत्र प्रक्रियेत अनेक इच्छुक व्यस्त असल्यामुळे शनिवारीही मनसेच्या मुलाखती सुरू राहतील असे राजाभाऊ डोखळे यांनी सांगितले. मनसेची पहिली यादी 22 जानेवारीला जाहीर होणार आहे.
मात्र, त्यानंतर मनसे काही जागांवर उमेदवार निश्चित करणार नाही. त्याबाबतचा निर्णय उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या काही दिवस आधी घेतला जाईल.
नामनिर्देशनपत्र भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज अर्थातच एबी फॉर्म भरण्याची मुदत असल्यामुळे मनसे अन्य पक्षातील बंडखोरी लक्षात घेऊन उमेदवारांची निश्चिती करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.