आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'राष्ट्रवादी' कोमात नव्हे तर अधिकच जोमात' , सत्ताधाऱ्यांकडे रोख; खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्रातील जनता युती सरकारला कंटाळली असून, शेतकरी-सामान्यांमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी असंताेष अाहे. काही लोक राष्ट्रवादी काँग्रेस कोमात गेली असल्याचे म्हणत असले तरी पक्ष आणखी जोमात आला आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

राष्ट्रवादी भवन येथे आयोजित आढावा बैठकीत त्या म्हणाल्या की, पक्षाध्यक्ष शरद पवार गेल्या ५० वर्षांपासून राजकारणात आहेत. आजपर्यंत एकही निवडणुकीत ते पराभूत झालेले नाहीत. ते २५ वर्षे सत्तेत २५ वर्षे विरोधी पक्षात होते. मात्र, विरोधात राहिले तेव्हा ते सर्वाधिक चर्चेत होते. विरोधक म्हणतात पक्ष संपला; मात्र पक्ष अाणखी मोठा होईल. नाशकात राष्ट्रवादी काँग्रेसला अधूनमधून मोठे झटके बसले आहेत. डॉ. वसंत पवार यांचे अकाली निधन आणि छगन भुजबळ यांना तुरुंगात जावे लागल्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले; पण पक्ष संपला असे नाही.

नाशिकच्या आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका यशस्वी करण्याची जबाबदारी प्रभारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा कसा फडकविता येईल, यावर लक्ष केंद्रीत करावे.

व्यासपीठावर महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, आमदार जयवंतराव जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नानासाहेब महाले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री चुंभळे, विश्वास ठाकूर, अमृता पवार, भारती पवार, अर्जुन टिळे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, अंबादास खैरे, सुनीता निमसे आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस औरंगाबाद येथील शिक्षकांच्या मोर्च्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलिस कर्मचाऱ्यास श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी भारत जाधव, रामू जाधव, मधुकर मौले, मनोहर बोराडे, सुरेश खेताडे, बाळासाहेब पाटील, योगेश दिवे, बाळासाहेब गिते, सचिन पिंगळे, वैभव देवरे, सलीम शेख, किशोर शिरसाठ, मनोहर कोरडे, विजय तुपलोंढे, खंडेराव दातीर, रामभाऊ जाधव, प्रतिभा पवार, चेतन कारे, जीवन रायते, शिवराज ओबेरॉय, नगरसेविका कविता कर्डक, उषाताई अहिरे, रंजना पवार, नीलिमा आमले, विक्रांत मते, सचिन महाजन, सुनील अहिरे, दीपा कमोद, चित्रा तांदळे, रंजना गांगुर्डे, शोभा सोनवणे, पुष्पा राठोड, मीरा शिंगोटे, सुरेश आव्हाड, दीपक वाघ, रवींद्र गामणे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन शहर सरचिटणीस संजय खैरनार यांनी केले.

शहरात आढावा बैठकीनिमित्त आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही बुधवारी नवरात्रोत्सवानिमित्त ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका मातेचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते देवीची महापूजा अभिषेक करण्यात आला. मंदिराचे विश्वस्त केशव आण्णा पाटील यांच्या हस्ते सुप्रिया सुळे यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सुळे यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, मंगळवारी रात्री केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना महाआरतीचा मान देण्यात आला होता. त्यांचे स्वागत सत्कार मंदिर ट्रस्टचे रामभाऊ पाटील यांनी केला. डॉ. भामरे यांनी विश्वस्तांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
बातम्या आणखी आहेत...