आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मादक द्रव्ये गुन्हेगारीत ‘उडता महाराष्ट्र’ आघाडीवर;बलात्काराच्या घटनांत देशात पहिले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने चर्चेत आलेल्या ‘उडता पंजाब’च्या पुढे महाराष्ट्राने गुन्हे नोंदवण्यामध्ये धडक मारली आहे. अमली पदार्थांच्या विरोधात देशात सर्वाधिक म्हणजे १८,९७९ गुन्हे एकट्या महाराष्ट्रात नोंदण्यात आले आहेत. त्याखालोखाल पंजाबमध्ये १०,१५९ गुन्ह्यांची नोंद आहे.

सन २०१४ च्या तुलनेत महाराष्ट्रातील या गुन्ह्यांची वाढ फक्त १५ टक्के आहे, तर पंजाबची ३५ टक्के. फक्त अमली पदार्थच नव्हे, तर खून, चोऱ्या, बलात्कार, हुंडाबळी आणि दंगली या गुन्ह्यांच्या नोंदींमध्येही महाराष्ट्र पुढे आहे. बलात्काराच्या घटनांमध्येही महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक लागतो.

गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ४१४४ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली. त्यानंतर मध्य प्रदेश (४३९१), राजस्थान (३६४४), उत्तर प्रदेश (३०२५) आणि ओडिशा (२२५१) अशा बलात्काराच्या गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. खुनाच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागला आहे. गेल्या वर्षभरात देशात सर्वाधिक खून उत्तर प्रदेशात (४७३२), त्यानंतर बिहार (३१७८) आणि महाराष्ट्र (२५०९) असे खुनांचे गुन्हे नोंदले गेले आहेत. चोरीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र अव्वल आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्डनुसार, गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ८५६१ जबरी चोऱ्या झाल्या, तर उत्तर प्रदेशात ३६३७, कर्नाटकात १९०६, ओडिशात १७८७ आणि तामिळनाडूमध्ये १७६३ चोऱ्यांचे गुन्हे झाले. किरकोळ चोऱ्यांमध्ये दिल्ली आघाडीवर आहे. देशाच्या राजधानीत वर्षभरात एक लाख हजार ४३२ चोऱ्या झाल्या. त्यातही महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ६१,१२८ चोऱ्यांची नोंद आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेश (२९,६४९), राजस्थान (२०,०६७), बिहार ( २२,४६२) आणि कर्नाटक (२०,७४८) अशी चोऱ्यांच्या गुन्ह्यांची नोंद आहे.

दंगलींच्या गुन्ह्यात बिहार अव्वल, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. बिहारमध्ये गेल्या वर्षी १३,३११ दंगलीचे गुन्हे घडले. तर महाराष्ट्रात ८,३३६ दंगली झाल्या. त्याखालोखाल उत्तर प्रदेश (६८१३), कर्नाटक (६६०२) आणि पश्चिम बंगाल (४०५७) असा क्रम लागताे. हुंडाबळीचे गुन्हे मात्र महाराष्ट्रात घटलेत. हुंडाबळीच्या सर्वाधिक केसेस उत्तर प्रदेशात (२३३५), त्याखालोखाल बिहार (११५४), मध्य प्रदेश (६६४), राजस्थान (४६३) आहेत. महाराष्ट्रात मात्र वर्षभरात २६८ हुंडाबळीच्या केसेसची नोंद झाली.

ड्रग्ज संबंधीचे गुन्हे
>महाराष्ट्र१८,९७९
>पंजाब १०,१५९
>उत्तर प्रदेश ६०९४
>केरळ ४१०३
>पश्चिम बंगाल १२९२

टीप: अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीत महाराष्ट्र अव्वल : वाचा, उद्या...
बातम्या आणखी आहेत...