नाशिक - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा १३ व्या राज्य बालनाट्य स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील विजेत्यांना विभागीय पारितोषिक वितरण समारंभात ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यात हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील नाट्यनिर्मितीचे प्रथम पारितोषिक नाशिक केंद्रातून लोकहितवादी मंडळाच्या "याही वळणावर' या नाटकासाठी, तर जळगाव केंद्रात मूळजी जेठा महाविद्यालयाच्या "नाना भोळे १२ शनिपेठ' या नाटकासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. बालनाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रात अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या "बीज पेरूया अंगात' या नाटकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. वीस हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. तर पारितोषिक वितरण सोहळ्यात सादर केलेल्या "नमन नटवरा' या कलाविष्काराने दाद मिळवली.
कालिदास कलामंदिरात बुधवारी (दि. १५) विभागीय पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या वर्षी नाशिक विभागातून हौशी मराठी नाट्यस्पर्धेत ५५ संस्थांनी, तर बालनाट्य स्पर्धेत ३४ संस्थांनी नाटके सादरे केली. सृजनशील दृष्टीने रंगभूमी समृद्ध व्हावी या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वेळी नाशिकसह जळगाव, अहमदनगर या केंद्रावरील प्राथमिक फेरीतील अभिनय गुणवत्ता, रंगभूषा, प्रकाश योजना, नेपथ्य, दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनय रौप्यपदके आणि नाट्यनिर्मिती या विभागातील विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. राजेश आहेर, प्रशांत वाघ, सुहास भोसले, नंदा रायते, अभय ओझरकर, अनिल दीक्षित, अरविंद भवाळकर, विजय रावळ, प्रकाश साळवे, बाळकृष्ण तिडके, सचिन शिंदे, मुकुंद कुलकर्णी, सुनील ढगे, मीना वाघ, प्रा. रवींद्र कदम, सुरेश गायधनी या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
{ नेपथ्य :
बालनाट्य स्पर्धा : नानामोरे (प्रथम), राजेश भालेराव (द्वितीय)
हौशीमराठी नाट्यस्पर्धा : किरणसमेळ (प्रथम), शैलेंद्र गौतम (द्वितीय)
{दिग्दर्शन :
बालनाट्य स्पर्धा : सोनालीवासकर (प्रथम), दीपक ओहोळ (द्वितीय)
हौशीमराठी नाट्यस्पर्धा : हेमंतदेशपांडे (प्रथम), प्रशांत हिरे (द्वितीय)
अपंगउत्तेजनार्थ : रमेशवनीस
{उत्कृष्ट अभियन रौप्यपदक :
बालनाट्य स्पर्धा : संस्कारगुंदेचा, पंकजा कराळे
हौशीमराठी नाट्यस्पर्धा : महेशडोकफोडे, लक्ष्मी पिंपळे
अपंगउत्तेजनार्थ : प्रबोधिनीविद्यामंदिर
{नाट्य निर्मिती :
बालनाट्य स्पर्धा : अहिल्यादेवीकन्या विद्यालय (प्रथम), सप्तरंग थिएटर्स (द्वितीय),
हौशीमराठी नाट्यस्पर्धा : लोकहितवादीमंडळ मूळजी जेठा महाविद्यालय (प्रथम), आर.एम. ग्रुप (द्वितीय), मेनली अॅमॅच्युअर संस्था (तृतीय)
{ अभियन गुणवत्ता प्रमाणपत्रे (नाशिक केंद्र)
बालनाट्य स्पर्धा : साक्षीभटकर, मुग्धा घेवरीकर, सई मोराणकर, कृष्णा चव्हाण, तेजस्विनी ठाकरे, चिन्मय जगताप, ऋषीकेश पर्वतीकर, लक्ष्य वायकर, अजय सोनार, मार्दव लोटके
हौशीमराठी नाट्यस्पर्धा : माधवीजाधव, प्रिया सातपुते, पल्लवी पटवर्धन, रसिका पुंड, शीतल थोरात, नरेंद्र दाते, शौनक गायधनी, सचिन रहाणे, विशाल रुपवते, भाऊसाहेब साळवी
{रंगभूषा
बालनाट्य स्पर्धा : माणिककानडे (प्रथम), नारायण देशपांडे (द्वितीय)
हौशीमराठी नाट्यस्पर्धा : माणिककानडे (प्रथम), सुजय भालेराव (द्वितीय)
{प्रकाश योजना :
बालनाट्य स्पर्धा : ईश्वरजगताप (प्रथम), पीयूष रावळ (द्वितीय)
हौशीमराठी नाट्यस्पर्धा : प्रबोधहिंगणे (प्रथम), रवी रहाणे (द्वितीय)