आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती अतिशय समृद्ध, तिची जपणूक आपली जबाबदारी- डॉ. कुरुष दलाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती ही अतिशय समृद्ध असून, तिची जपणूक करण्याची जबाबदारी खवैय्यांची असल्याचे मत डॉ. कुरुष दलाल यांनी मांडले. - Divya Marathi
महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती ही अतिशय समृद्ध असून, तिची जपणूक करण्याची जबाबदारी खवैय्यांची असल्याचे मत डॉ. कुरुष दलाल यांनी मांडले.
नाशिक- भारतीय विविधतेची ओळख म्हणजे भारतीय खाद्य संस्कृती, त्यातही प्रामुख्याने जेव्हा महाराष्ट्रीयन जेवण किंवा खाद्य पदार्थांचा विषय येतो त्यातील वैविध्य हे काही औरच आहे. घरी केलेले वाटण, शंभर प्रकारच्या भाज्या, बाजरीची भाकरी आणि गोड पदार्थांची लज्जत या गोष्टी मात्र आता हरवत चालल्या आहेत. याची जपणूक करण्याची जबाबदारी आताच्या खवैय्यांची आहे, अशी भावना डॉ. कुरुष दलाल यांनी व्यक्त केली.
 
दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये डॉ. कुरुष दलाल यांनी "खजिना मराठी पाककृतींचा" या विषयावर आपले विचार मांडले. राकेश दवाणी यांनी कुरुष यांना बोलते केले.
 
कुरुष म्हणाले, महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती ही अतिशय समृद्ध आहे. त्याचा इतिहास पाहायला गेल्यास यामध्ये वैविध्य होते. ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, जव या गोष्टी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खालल्या जायच्या. याच बरोबर खाद्य संस्कृतीचा इतिहास पाहिल्यास महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बैलाचे मटण सर्वाधिक खाल्ले जायचे. आज ही गोष्ट मान्य देखील केली जाणार नाही. मुळात मटण हेच महाराष्ट्रीयन आहारातून गेल्या 60 वर्षांपूर्वी चिकन आल्यावर काढून टाकले गेले. पण लोकांच्या हे लक्षात आले नाही की, मुख्य खाद्य पदार्थाची जागा घेताना त्यासोबत वापरले जाणारे मसाले बदलले जातात. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीवर परिणाम करणारा घटक म्हणजे, विभक्त कुटुंब पद्धती आणि खाद्य पदार्थांविषयीचे मिथक आहेत.
 
कुरूष म्हणाले, आपल्या सामाजिक रचनेमध्ये या खाद्य संस्कृतीमधील बदलाचा कसा परिणाम झाला हे शोधण्याचा प्रयत्न केला असता लोकांमध्ये असलेली प्रतिष्ठा आणि पारंपरिक चवीचा कंटाळा या दोन गोष्टी मराठी खाद्य संस्कृतीला मागे टाकणाऱ्या आहेत असे लक्षात आले. या सत्रामध्ये कुरुष यांनी मराठी पारंपरिक खाद्य पदार्थ, त्यांचा इतिहास या गोष्टी उलगडून सांगितल्या. या सत्रामध्ये राकेश दवाणी यांनी कुरुष यांची मुलाखत घेतली. 
 
पापड लोणची ही त्या काळातील सोशल मीडिया-
 
आज जसे सोशल मीडियावर आठवणी, अडचणी आणि अपेक्षा व्यक्त होतात. अशाच त्या वेळी पापड, लोणची आणि वाळवण तयार करताना महिला व्यक्त करत होत्या. त्यामुळे हा प्रकार त्या काळातील सोशल मीडिया असल्याचे डॉ. कुरुष दलाल म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...