आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra\'s Top Most Amazing And Famous Water Falls

हे कॅनडा, अमेरिका नाही... पाहा, नाशिक, नगर, अमरावतीची अवखळ...खळखळ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा कॅनडातील अल्फ्रड क्रिक, कॅलिफोर्नियाचा अलमेरे फॉल्स किंवा व्हेनेझुएलाचा एन्जल धबधबा परिसर नाही तर नाशिकमधील सिन्नर तालुक्याचा निसर्गसंपन्न भाग आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी वेढलेला हा परिसर आहे.
पुष्प नक्षत्र महाराष्ट्रातील बहूतेक भागात कोरडेच गेले, तरी रविवारी सुरू झालेल्या अश्लेषा नक्षत्राच्या पहिल्याच टप्प्यात पावसाचे चांगले आगमन झाल्यामुळे राज्यातील लहान-मोठ्या नद्या वाहू लागल्या आहेत.
सह्याद्री, सातपुड्याच्या पर्वतरांगांतून सृष्टी सौंदर्याची मुक्त उधळण होत असून विहंगम दृष्य मनमोहून घेत आहे.
'दिव्य मराठी'च्या ठिकठिकाणच्या छायाचित्रकारांनी हा निसर्ग कॅमेरात कैद केला आहे. आम्ही तो खास घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी.
छायाचित्र - अकोले व इगतपुरी तालुक्याच्या सरहद्दीवर हा धबधबा येतो. सिन्नरहून ठाणगावमार्गे अकोल्याच्या डोंगरवाटांचा आनंद घेत केळीच्या मंदिराचे दर्शन घेता येते. तिन्ही तालुक्यांच्या सरहद्दीवर असलेला म्हैसवळण घाट पार करताना पावसाळ्यात निसर्गाच्या ओंजळीतून उधळणार्‍या संपन्नतेचा पुरेपूर आनंद लुटता येतो. या घाटातून टाकेदमार्गे वासाळीस जाता येते. हे गाव भंडारदरा धरणापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. भंडारदरा घाटाच्या पायथ्याशी आंबेवाडी-कुरुंगवाडी फाटा लागतो. तेथून पावलोपावली निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत 15 किलोमीटर अंतर कसे मागे पडते, हे समजतही नाही. भावली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेले कुरुंगवाडी गाव येऊन ठेपते. या रस्त्याच्या कडेला मोठय़ा संख्येने धबधब्याद्वारे कोसळणारे जलप्रपात पाहून अंग मोहरून जाते. कोणत्या धबधब्याखाली जावे अन् कुठला सोडावा, असे होऊन जाते.

(छायाचित्रकार : कैलास नवले, सचिन बोरसे)

पुढील स्लाइडमध्ये पाहा, निसर्गाची मुक्त उधळण