आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिकालदर्शी त्रिलाेकस्वामी त्रयक्षत्रंबक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बम बम भोले,’ ‘ओम नम: शिवाय,’ ‘सौराष्ट्र सोमनाथंच...’ अशा मंत्रोच्चारात शहरातील विविध मंदिरांत भाविकांनी भोळ्या शंभोची पूजा केली. कुठे अखंड अभिषेक, तर कुठे अखंड बेलपत्राभिषेक सुरू होता. यानिमित्ताने शहरातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले.
शहरातील महत्त्वाच्या अशा कपालेश्वर मंदिर आणि सोमेश्वरला भाविकांनी विशेष गर्दी केली होती. सोमेश्वरला तर जत्रेचे स्वरूप आले होते. नाशिक शहरासह परिसरातील खेड्यापाड्यांतील भाविक सोमेश्वरला दर्शनासाठी येत असल्याने येथे पहाटेपासूनच गर्दी झाली होती. यानिमित्ताने जवळच असलेल्या बालाजी मंदिर परिसरालाही जत्रेचे स्वरूप आले होते.
नाशिक - गंगापूररोडवरील सोमेश्वर मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. सकाळपासूनच येथे लांबच लांब रांग लागलेली होती. शहरा बरोबरच आसपासच्या ग्रामीण भागातूनही भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. पोलिस बंदोबस्त असल्याने सर्व भाविकांचे दर्शन शांततेत पार पडले. काही सामाजिक उपक्रमही या ठिकाणी पार पडले.
हरहर महादेव’चा गजर करीत नाशिकरोड, विहितगाव, सिन्नर फाटा, देवळालीगाव, जेलरोड येथील मंदिरांत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. विविध संस्था मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले.

गोसावी समाजातर्फे मिरवणूक : श्रीदशनाम गोसावी समाजाच्या नाशिकरोड शाखेतर्फे महात्मा गांधी टाऊनहॉल येथून मिरवणूक काढण्यात आली. आमदार योगेश घोलप यांच्या हस्ते शुभारंभ झाला. मिरवणुकीत ‘जय मल्हार’चा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. त्यानंतर टाऊनहॉलमध्ये अॅड. अपर्णा रामतीर्थंकर यांचे प्रवचन झाले.
कार्यक्रमाप्रसंगी संजय गोसावी, महेश गोसावी, दीपक गोसावी आदींची उपस्थिती होती. देवळालीच्या गवळीवाडा येथील प्राचीन मनकामेश्वर मंदिरातही अभिषेक, शिवलिंग पूजनासह धार्मिक झाले.