आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महा एसएमई संकेतस्थळ उद्योजकांसाठी मार्गदर्शक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांना केंद्र व राज्य सरकारचे निर्णय तसेच धोरणाविषयी कायम अपडेट ठेवणारे ‘महाएसएमई’ हे संकेतस्थळ सध्या उद्योजकांसाठी लाभदायी ठरत आहे. शासनाची परिपत्रके, विविध नियम यांची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून उद्योजकांनी समस्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांना कायदेशीर मार्गदर्शनही या माध्यमातून मिळणार आहे.

महाउद्योग मित्र आघाडीने www.mahasme.com हे संकेतस्थळ सुरू केले आहे. मूळ नांदेडचा व सध्या हैदराबादेत नोकरीस असलेले आयटी इंजिनिअर चिन्मय गंगाखेडकर आणि रोहन पेशकार यांनी या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

संकेतस्थळावर काय?
- सर्व शासकीय परिपत्रके, नियमाची माहिती, शिवाय ‘कॅलेंडर’ या पर्यायावर क्लिक केल्यावर महिन्यानूसार कर भरण्याची माहिती समोर येते.
- ‘एक्झिबिशन’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर देशभरात कोणती औद्योगिक प्रदर्शने आहेत याची यादी महिन्यांनुसार मिळते.
- ‘निड हेल्प’ या पर्यायावर गेल्यानंतर नाव, मेल आणि समस्या लिहून सबमिट केल्यानंतर ‘उद्योग मित्र’च्या बॅक ऑफिसतर्फे मार्गदर्शन किंवा मदत दिली जाते.