आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महावितरण’चे ग्राहक सुविधा केंद्र २० दिवसांपासून बंदच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वीजग्राहकांना बिल भरताना अधिक त्रास होऊ नये म्हणून ‘महावितरण’च्या वतीने द्वारका परिसरात ग्राहक सुविधा केंद्राची स्थापना करण्यात अाली. मात्र, गेल्या २० दिवसांपासून म्हणजे ऑक्टोबरपासून या कार्यालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ठेका संपल्यामुळे कार्यालयाचे सर्व कामकाज बंद पडले आहे. अचानक बंद पडलेल्या या ग्राहक सुविधा केंद्रामुळे वीजग्राहकांना बिल भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून बंद झालेले हे कार्यालय सुरू करण्याबाबत वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचीही धक्कादायक बाब समोर आली अाहे.
वीजबिलाच्या नावात बदल असेल किंवा मीटरसंबंधी काही तक्रार असेल, बिलावर रक्कम जास्त लागून अाली असेल अशा विविध तक्रारींचा निपटारा करण्यासाठी तसेच ग्राहकांचे हाल होऊ नये यासाठी महावितरणच्या वतीने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी द्वारका परिसरात ग्राहक सुविधा केंद्र सुरू केले. तसेच, ग्राहकांना पारदर्शक चांगली सेवा देता यावी म्हणून वीज कंपनीने ही सुविधा शहरात उपलब्ध केली होती. या सुविधा केंद्रामुळे वीजग्राहकांना लांबलचक रांगेपासून काही प्रमाणात मुक्तता मिळाली होती. मात्र, द्वारका परिसरात असलेले हे ग्राहक सुविधा केंद्र बंद असल्याने बिल भरताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या ऑक्टोबरपासून या कर्मचाऱ्यांचा ठेका संपलेला अाहे. ठेका संपल्यानंतर कार्यालयातील सर्व कर्मचारी ठेकेदारामार्फत काम करणारे असल्यामुळे या कार्यालयातील सर्व कामकाज थांबले आहे.

दररोज शेकडो ग्राहक या कार्यालयात तक्रारी घेऊन येत असताना त्यांच्या या तक्रारींवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. ग्राहक सुविधा केंद्र ही सुविधा वीजग्राहकांच्या पसंतीस उतरली असताना कर्मचाऱ्यांअभावी २० दिवसांपासून सदर केंद्रच बंद आहे. यामुळे चांगल्या सुविधेला वीजग्राहक मुकले आहेत. हे ग्राहक सुविधा केंद्र बंद असल्यामुळे दररोज शेकडो ग्राहकांची हेळसांड होत आहे.

या परिसरासाठी अाहे सुविधा केंद्र : पंचवटी, मध्य नाशिक, जुने नाशिक, गंगापूर गाव, गंगापूररोड, सातपूर, सिडको, द्वारका, त्र्यंबक, देवळालीगाव, नाशिकरोड या भागाचे काम या ग्राहक सुविधा केंद्रात चालते.

फक्त अभियंत्यांकडूनच काम सुरू...
^ग्राहकसुविधाकेंद्रात असलेले सर्व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करणारे होते. त्यांचा ठेका संपल्यापासून कार्यालयात कर्मचारी नाही. नवीन ठेका देण्याबाबत वरिष्ठस्तरावर हालचाली सुरू आहेत. कार्यालयात अभियंत्यांकडून काम सुरू असून, इतर कामांना अडचणी येतआहेत. - प्रशांत पराते, अतिरिक्त उपअभियंता, ग्राहक सुविधा केंद्र, महावितरण

अशी आहे आकडेवारी
{दररोज २५० ते ३०० ग्राहकांची होते नोंदणी
{कंत्राटी कर्मचारी, उपअभियंता, सुरक्षारक्षक, टपाल पोहोचविण्यासाठी कर्मचारी, या कर्मचाऱ्यांची होती केंद्रात नियुक्ती
{२० दिवसांपासून ग्राहक सुविधा बंद
बातम्या आणखी आहेत...