आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक : वीजदराच्या कपातीचे ‘महािवतरण’चे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - नियाेजित वाढीव वीजदरात कपात करण्याबराेबरच ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी सध्याच्या क्लिष्ट तरतुदी वगळण्याचे स्पष्ट संकेत महावितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अाे. पी. गुप्ता यांनी नाशिक येथून गेलेल्या वीजग्राहक समितीच्या प्रतिनिधींसमवेतच्या चर्चेत दिले.
प्रस्तावित वीजदरवाढीच्या पार्श्वभूमीवर वीजग्राहक समितीचे राज्यातील प्रमुख प्रतिनिधी वीज नियामक अायाेग प्रतिनिधींबराेबर महावितरणच्या ‘प्रकाशगड’ या मुंबईतील कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत वीजग्राहक समितीचे नाशिक येथील प्रतिनिधी अॅड. सिद्धार्थ वर्मा तसेच हेमंत कपाडीया हे उपस्थित हाेते.
यावेळी प्रतिनिधींनी महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले. यामध्ये १४ हजार काेटी रुपयांपर्यंतचा खर्च हिशेब वाचवण्यासाठी सुचविलेल्या विविध पर्यायांपैकी बहुतांश मुद्दे व्यवस्थापकीय संचालक गुप्ता यांनी तत्त्वत: मान्य केले. त्यात ३००३ काेटी रुपयांचा एफएसी, महाजनकाेस द्यावे लागणारे व्याज, पारेषण कंपनीस द्यावा लागणारा अाकार, अधिक उपलब्ध वीज त्यातून मिळू शकणारे उत्पन्न, संचलनावर हाेणारा खर्च अादी विषयांचा समावेश हाेता.
राज्यातील ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांही यावेळी मांडण्यात अाल्या. त्यात त्वरित भरणा सवलत याेग्य प्रकारे राबवणे, नवीन वीजपुरवठा मुदतीत मिळणे, व्हाेल्टेज कमी-जास्त हाेणे त्यामुळे हाेणारे नुकसान, सुरक्षा अनामत रकमेची गैरवाजवी मागणी, ग्राहक सेवा सुधारणा, अपघातग्रस्त व्यक्तींना भरपाई देण्यास हाेणारा विलंब, अधिकाऱ्यांकडून हाेणारा अधिकारांचा गैरवापर यासह ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या अडचणी मांडण्यात अाल्या. व्यवस्थापकीय संचालक अाे. पी. गुप्ता यांनी ग्राहक समिती प्रतिनिधींनी सुचवलेल्या मुद्यांवर सहमती दर्शवत नियाेजित वाढीव वीजदर कपात करण्यासाठी प्रयत्न करण्याचे अाश्वासन दिले.
प्रशासकीय स्तरावर अामूलाग्र बदल घडवण्याचे ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी अस्तित्वातील क्लिष्ट तरतुदी वगळण्याचे संकेत दिले. बैठकीस महावितरणचे संचालक अभिजित देशपांडे तसेच ग्राहक प्रतिनिधी अॅड. सिद्धार्थ वर्मा, प्रताप हाेगाडे, अाशिष चंदाराणा, हेमंत कपाडीया, शांतनू दीक्षित, एस. एल. पाटील उपस्थित हाेते.

ग्राहकांशी साधणार संवाद

संपूर्ण राज्यात विभागनिहाय दाैरा करून ग्राहकांशी संवाद साधून अडीअडचणी अापण जाणून घेणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले. तसेच, परिमंडलस्तरावर कामकाज सुधारण्यासाठी मुख्य अभियंता, ग्राहक प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

फोटो - प्रकाश गड येथील बैठकीप्रसंगी अॅड. सिद्धार्थ शर्मा, अभिजित देशपांडे, अाे. पी. गुप्ता अादींसह मान्यवर.