आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महावितरण’च्या कामांबाबत उद्याेजकांची नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या महिनाभरापासून हाेणारा खंडित वीजपुरवठा त्यामुळे खंडित हाेणारी उत्पादन प्रक्रिया, मशिनरी जळणे, वायर जळणे, विविध सेक्टरमध्ये सलग दाेन ते चार तास वीजपुरवठा खंडित राहून उत्पादन प्रक्रिया बंद पडणे, कामगारांना काम नसणे अशा अडचणी उभ्या राहत अाहेत, अशा स्वरूपाच्या उच्च दाब वीजपुरवठ्याबाबतच्या समस्यांना सामाेरे जावे लागत असल्याच्या तक्रारींचा पाढाच अंबड अाैद्याेगिक वसाहतीतील उद्याेजकांनी ‘महावितरण’चे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्यासमाेर वाचला.
अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशनच्या (अायमा) पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांच्या नेतृत्वाखाली कुमठेकर यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात माजी अध्यक्ष धनंजय बेळे, सरचिटणीस निखिल पांचाळ यांचा समावेश हाेता.

अाैद्याेगिक वसाहतीत १० जूनला महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाेबत वीजपुरवठ्याबाबत झालेल्या बैठकीत अखंडित वीजपुरवठ्याकरिता महावितरणची यंत्रणा सक्षम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले हाेते. प्रत्यक्षात मात्र समस्या अाजही कायम असल्याने अाता पुन्हा चर्चा करावी लागल्याचे अहिरे यांनी यावेळी स्पष्ट केले. यानंतर मुख्य अभियंता कुमठेकर यांनी उद्याेजकांचे प्रश्न साेडविण्यास प्राधान्य देण्यात येईल समस्या निराकरणासाठी ‘अायमा’त अधिकारी उद्याेजकांच्या बैठका घेतल्या जातील, असे सांगितले हाेते. त्यानुसार मंगळवारी पहिलीच बैठक अायमा रिक्रिएशन सेंटरमध्ये झाली. त्यात उद्याेजकांनी अापल्या तक्रारी सादर केल्या.

बैठकीत कार्यकारी अभियंता सवाईराम, कनिष्ठ अभियंता धवल अागरकर यांसह अायमाच्या उपाध्यक्षा नीलिमा पाटील, ललित बूब, हिमांशू कनानी, सिद्धार्थ पाटील उद्याेजक उपस्थित हाेते. बैठकीत मांडण्यात अालेल्या सर्व तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्या समस्या साेडविण्याचे अाश्वासन ‘महावितरण’च्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

बातम्या आणखी आहेत...