आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा : महिमा चौधरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- मराठी भाषा बोलता येत नसली, तरी कधी संधी मिळाली तर नक्कीच भूमिका करेन, या शब्दांत हिंदी चित्रपट अभिनेत्री महिमा चौधरी यांनी मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. जुना सायखेडारोडवरील दुर्गामाता देवस्थान ट्रस्टतर्फे नवरात्रीनिमित्त आयोजित बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

नवरात्रोत्सवादरम्यान झालेल्या बुगी-बुगी, डान्स, संगीत खुर्ची, पाककला व रांगोळी या स्पर्धांतील विजेत्यांना महिमा चौधरी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. त्यांना पाहाण्यासाठी परिसरातील तरुणाईची मोठी गर्दी लोटली होती. या वेळी महिमाच्या हस्ते ‘लकी ड्रॉ’ काढण्यात आला. सोहळ्याचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक शैलेश ढगे यांनी केले. व्यासपीठावर विक्रीकर अधिकारी राजेंद्र तुपे, हास्य कलावंत सर्फराज एहसना उपस्थित होते.