आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahindra & Mahindra Company,latest News In Divya Marathi

महिंद्रा'च्या कामगारांची दिवाळी जोरात, मिळणार 15 हजारांपासून 74 हजार रुपयांपर्यंत बोनस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर- औद्योगिक कवसाहतीमधील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने दिवाळी बोनसचा सातपूर औद्योगिक वसाहतीतील आजवरचा सर्वच विक्रम मोडीत काढला आहे. यंदा कामगारांना श्रेणीनुसार कमीत कमी १४ हजार ८८५ तर, जास्तीत जास्त ७३ हजार ९११ रुपये बोनस जाहीर केला आहे.
गुरुवारी (दि. ९) बोनसचे वाटप करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे महिंद्रा कामगारांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे. दिवाळीचा सण जवळ येत असल्याने सध्या सर्वच कंपन्यांतील कामगारांना बोनसचे वेध लागले आहेत, औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कारखान्यांमध्ये बोनस वेतनवाढीचे करार करण्यात आले असून, काही कारखाना व्यवस्थापनांमध्ये युनियन पदाधिका-यांची यशस्वी बोलणी सुरू आहे.
कामगारांना मिळणा-या बोनसकडे कामगार कुटुंबीयांचेच नव्हे, तर व्यापारीवर्गाचेदेखील लक्ष लागून असते. कारण त्यानंतरच बाजारपेठेत जाऊन खरेदीचा आनंद लुटता येतो. दिवाळीच्या काळात ही उलाढाल कोट्यवधी रुपयांचा टप्पा पार करत असते. एकट्या महिंद्रा कंपनीतील दोन हजार 840 कामगारांना बोनसचा लाभ होणार आहे. कंपनी व्यवस्थापन अंतर्गत कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या यशस्वी करारामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.