आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्रातील उत्पादन प्रक्रिया पुन्हा सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सातपूर येथील महिंद्रा अँड महिंद्रातील उत्पादन प्रक्रिया मंगळवारी पुन्हा सुरू झाली. कंपनीत उत्पादित वाहनांचा अतिरिक्त साठा उपलब्ध असल्याने व नवीन उत्पादन ठेवण्यास जागा नसल्याने ही प्रकिया चार दिवस बंद ठेवण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात प्रशिक्षण कार्यक्रमासारखे उत्पादनाव्यतिरिक्तचे कामकाज सुरू होते, तर उत्पादन प्रक्रियेतील कामगारांना पंचिंग करून पगारी सुटी दिली जात होती, अशी माहिती कार्मिक विभागाचे महाव्यवस्थापक अनिल गोडबोले यांनी दिली. मंदीच्या पार्श्वभूमीवर मारुतीसह अनेक कंपन्यांची विक्री घटल्याने या कंपन्यांनी 15 दिवसांपूर्वीच मुंबई शेअर बाजाराला उत्पादन प्रक्रिया चार दिवस बंद ठेवणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार महिंद्राचे उत्पादनही चार दिवस बंद होते.

अन्य काही कंपन्यांतही ‘ले ऑफ’ : मंदीचा परिणाम म्हणून आता प्रीसिजन टूल्सने 21 जुलैपासून अनियमित काळासाठी उत्पादन प्रक्रिया बंद केल्याची नोटीस लावली आहे.