आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील प्रमुख मार्ग चार दिवस राहणार बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात गणेशभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने वाहतुकीच्या नियोजनात बदल केले आहेत. त्यानुसार रविवार (दि. ११) ते बुधवारपर्यंत (दि. १४) सायंकाळी ते रात्री १२ वाजेदरम्यान वाहनांना प्रमुख मार्गांवर प्रवेश बंद असेल.
शहरात विविध सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. सार्वजनिक मंडळांकडून यंदा सामाजिक प्रबोधनासह धार्मिक देखावेही सादर करण्यात आले आहेत. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी शहरांतर्गत प्रमुख मार्गावरील वाहतुकीत बदल केले आहेत.
असा असेल पर्यायी मार्ग : खडकाळीसिग्नल - किटकॅट कॉर्नर - मोडक सिग्नल - सीबीएस सिग्नल - मेहेर सिग्नल - अशोकस्तंभ - रामवाडीमार्गे मालेगाव स्टँड येथून अन्य ठिकाणी किंवा खडकाळी सिग्नल - किटकॅट कॉर्नर - मोडक सिग्नल - सी. बी. एस. सिग्नल - मेहेर सिग्नल - अशोकस्तंभ - रामवाडी- मखमलाबाद नाका - पेठ नाका - दिंडोरी नाका किंवा सारडा सर्कल - गडकरी सिग्नल - मोडक सिग्नल - सीबीएस सिग्नल - मेहेर सिग्नल - अशोकस्तंभ - रामवाडी मार्गे मालेगाव स्टॅण्ड किंवा खडकाळी सिग्नल - किटकॅट कॉर्नर- मोडक सिग्नल- सीबीएस- मेहेर सिग्नल- रामवाडी- मखमलाबाद- पेठनाका- दिंडोरी नाका.

यामार्गावरील वाहतुकीत बदल : संभाव्यगर्दी लक्षात घेता निमाणी बसस्थानक - मालेगाव स्टँड - रविवार कारंजा मार्गावरून जाणाऱ्या सर्व एसटी बसेस जड वाहनांना शुक्रवार (दि. ९), रविवार (दि. ११), बुधवार (दि. १४) या कालावधीत दुपारी ते रात्री १२ वाजेदरम्यान प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या मार्गावरील सर्व बसेस सर्व जड वाहनांनाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

हे असतील पर्यायी मार्ग : पंचवटीकारंजा- काट्या मारुती चौक - संतोष टी पॉइंट - कन्नमवार पूल - द्वारका सर्कल हा मार्ग, अशोकस्तंभ - रामवाडी पूल - मखमलाबाद नाका - पेठ नाका सिग्नल - दिंडोरी नाका या मार्गावरून पुढे निमाणी स्टँड.

{ खडकाळी सिग्नल येथून शालीमारमार्गे सीबीएस.
{ खडकाळी येथून दिपसन्स कॉर्नर- नेहरू गार्डनकडून गाडगे महाराज पुतळा मार्ग- मेनरोड बादशाही कॉर्नर.
{ त्र्यंबक पोलिस चौकी ते बादशाही कॉर्नर.
{ गाडगे महाराज पुतळा- धुमाळ पाॅईट ते मंगेश मिठाई कॉर्नर.
{ मेहेर सिग्नलकडून संागली बँक सिग्नल- धुमाळ पॉइंट- दहीपुलाकडे.
{ प्रतिक लॉजकडून पुढे नेपाळी कॉर्नरकडे.
{ अशोक स्तंभाकडून रविवार कारंजा- मालेगाव स्टँडकडे
{ रविवार कारंजाकडून सांगली बँक सिग्नल.
बातम्या आणखी आहेत...