जुने नाशिक- मेनरोडवरीलभिकुसा लेन परिसरातील जुना तीन मजली वाडा मंगळवारी (दि. २५) दुपारी तीनच्या सुमारास अचानक काेसळला. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. वाड्यातील गुदामाशेजारील वडापावची गाडी एका रिक्षाचे नुकसान झाले.
श्रीपाल छाजेड यांच्या मालकीचा ६० ते ६५ वर्षांपूर्वीचा हा वाडा माेठा आवाज हाेऊन कोसळला. वाड्याच्या तळमजल्यावर चांदवडकर यांचे घड्याळाचे गुदाम, दुसऱ्या मजल्यावर रुमालांचे गुदाम, तर तिसऱ्या मजल्यावर छाजेड कुटुंबीय राहतात. अन्य भागात सध्या कोणीही वास्तव्यास नसल्याने हानी झाली नाही. गोटूदादा वडापाव ही गाडी एक रिक्षा (एम. १५, झेड. ९६०३) यांच्यावर वाड्याचे जुने बांधकाम कोसळल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले. वडापावच्या गाडीवरील गॅस शेगडी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित हलवल्याने अनर्थ टळला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही तत्काळ वाड्याचा वीजपुरवठा खंडित केला. या घटनेमुळे पुन्हा एकदा धोकेदायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाड्याचा काही भाग कोसळल्याने रिक्षाचे असे नुकसान झाले.