आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैत्रेय’च्या ठेवी १८ नंतर परत मिळण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘मैत्रेय’च्या हजाराे गुंतवणूकदारांच्या ठेवी १८ एप्रिलनंतर परत मिळण्याची शक्यता आहे. कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सोमवारी (दि. १८) सुनावणी होणार आहे. यानंतर नाशिकसह राज्यातील गुंतवणूकदारांच्या ठेवी एस्क्रो खात्यातून वाटप होण्याची शक्यता आहे. सेबीने मैत्रेय कंपनीला त्यांच्या सर्व मालमत्ता विक्री करण्यासाठी निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध उठण्याची शक्यता असल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सत्पाळकर सध्या अंतरिम जामिनावर बाहेर आहेत. गुंतवणूकदारांचे सर्व पैसे परत करण्याचे लेखी अश्वासन त्यांनी न्यायालयाला दिले आहे. एस्क्रो खात्यात त्यांनी एक कोटी ४७ लाख रुपये भरणा केला आहे. १२५ बँक खात्यांतील सुमारे एक कोटीची रक्कमही एस्क्रो खात्यात जमा करण्यात आली असल्याचे सत्पाळकर यांचे वकील अॅड. राहुल कासलीवाल यांनी सांगितले. कंपनीची मालमत्ता जप्त होण्याच्या भीतीने खरेदी करण्यासाठी कोणी गुंतवणूकदार पुढे येत नसल्याने कंपनीला तांत्रिक अडचण निर्माण होत अाहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास कंपनीला अडचण होत असली तरी एस्क्रो खात्यातील जमा रक्कम गुंतवणूकदारांना वाटप करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कार्यवाही सुरू झाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...