आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रेय : आणखी १५१ ठेवीदारांच्या २१ लाखांच्या ठेवी हाेणार जमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मैत्रेय कंपनीच्या आणखी १५१ ठेवीदारांना २१ लाख २२ हजार रुपयांच्या ठेवी थेट ठेवीदारांच्या खात्यात सोमवारी जमा होणार आहेत. पोलिसांच्या समितीने आज पर्यंन्त २७६ ठेवीदारांच्या ३८ लाख ५६ हजारांच्या ठेवींची वाटप केली आहे. मैत्रेय कंपनीच्या १२५ ठेवीदारांना धनादेश वाटप करण्यात आले होते. यानंतर शासकीय समितीने ठेवीच्या मुदत आणि चेक परत गेलेल्या ठेवीदारांचा प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करण्यात येत अाहे. यादी नुसार आणखी १५१ ठेवीदारांचे २१ लाख २२ हजार १५४ रुपयांच्या ठेवी थेट ठेवीदारांच्या खात्यात इसीसीएस ने सोमवारी जमा होणार आहे.

नाशिकचे पोलिस आयुक्त एस.जगन्नाथन यांनी तपासी पथक आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना कमीत कमी वेळत जास्तीत जास्त ठेवीदारांच्या देय रक्कमेचा परतावा देण्याच्या आदेश दिले आहे. ज्या ठेवीदारांना समितीचे सदस्य फोन करतील त्यांनी ठेवीचे मुळ कागदपत्र बँक पासबुक, ओळखपत्र, कंपनीत ठेवी असल्याच्या पावत्या घेऊन येण्याचे आवाहन नाशिकमधील सरकारवाडा पोलिसांकडून करण्यात आले आहे.