आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्य राज्यांतील ठेवीदारांचे आयुक्तांना साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मैत्रेय कंपनीच्या गुंतवणूकदारांना ठेवी वाटप होण्याची प्रक्रिया सुरूच असून, पाच महिन्यांत हजार ३९७ ठेवीदारांना सुमारे कोटी ६५ लाखांच्या ठेवी वाटप करण्यात आल्या. समितीच्या वतीने तयार केलेली २१ वी यादी गुरुवारी (दि. ३) बँकेत पाठविण्यात आली. या सर्व ठेवी एस्क्रो खात्यातून थेट ठेवीदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्या.
मैत्रेय कंपनीकडून ठेवीदारांना पोलिस अणि शासनाच्या समितीकडून ठेवी वाटप होण्यास जुलै २०१६ मध्ये न्यायालयाच्या आदेशान्वये प्रारंभ झाला. न्यायालयाच्या आदेशानुसार एस्क्रो खाते उघडण्यात आले. या खात्यात कंपनीकडून कोटी ४० लाख रुपये जमा करण्यात आले होते. ५० हजारांच्या आत गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांना ठेवी वाटप करण्यात येत आहे. पाच महिन्यांत ठेवीदारांच्या २१ व्या यादीनुसार हजार ३९७ ठेवीदारांना कोटी ६५ लाख हजार ३०१ रुपयांच्या ठेवी वाटप करण्यात आल्या आहेत. सरकारवाडा पोलिसांच्या पाठपुराव्याने कंपनीकडून अाणखी ८५ लाखांची रक्कम भरण्यात येणार अाहे.

कंपनीची मालमत्ता विक्री करून टप्याटप्प्याने सुमारे ११ कोटी रुपये एस्क्रो खात्यात जमा होणार आहेत. जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना प्राधान्य देत राज्यासह देशभरातील ठेवीदारांच्या ठेवीदेखील टप्प्याटप्प्याने वाटप होणार असल्याने कंपनीच्या देशाभरातील ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. कंपनीकडून अधिक रक्कम जमा करण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, दिलीप शिंदे, सचिन अहिरराव प्रयत्नशील आहेत.
मैत्रेयकंपनीच्या कर्नाटक राज्यातील आणि सांगली जिल्ह्यातील एजंट आणि ठेवीदारांनी पोलिस आयुक्तांची भेट घेत कंपनीला सहकार्य करण्याची मागणी केली. नाशिक पोलिसांकडून राज्यातील इतर पोलिस ठाण्यांना काही योग्य माहिती दिली जात नसल्याने संचालकांना अटक करण्याचे आदेश निघत आहेत. संचालकांना अटक झाल्यास ठेवीदारांचे पैसे मिळणे बंद होतील. ठेवीदारांसह एजंटांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. नाशिकच्या एस्क्रो खात्यातून ठेवी परत मिळाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मैत्रेय कंपनीच्या एजंट आणि ठेवीदारांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांना दिलेल्या निवेदनानुसार कंपनीकडून हजार कोटी रुपयांचे ठेवी वाटप केल्या आहेत. असंख्य ठेवीदार, एजंटचेे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या मैत्रेय कंपनीमुळे पार पाडणे शक्य झाले आहे. सेबीने तीन वर्षांपूर्वी कंपनीवर मालमत्ता विक्री करण्यास केलेली बंदी आणि आर्थिक मंदीमुळे कंपनीला पैसे परत करण्यास विलंब झाला. कंपनीकडून पैसे परत करणे सुरू असल्याने कंपनीवर विश्वास आहे. सरकारवाडा पोलिसांनी केलेली कारवाई कायद्याला धरून नव्हती. कारवाईदरम्यान कंपनीच्या संचालकांनी पोलिसांना सहकार्य केले, मात्र अमरावती, परभणी पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने राज्यात दोन स्वतंत्र आदेश निघाले आहेत. नाशिक पोलिसांनी कारवाई केल्याचा ठपका ठेवत औरंगाबाद पोलिसांनी नाशिकच्या एस्क्रो खात्यातून मिळणाऱ्या ठेवीचा परतावा अवैध ठरवला आहे.

पहिला गुन्हा नाशिकमध्ये दाखल झाला. तेथील पोलिसांंनी व्यवस्थापनाकडून अपेक्षित सहकार्य मिळाल्याने त्यांनी तपास पूर्ण केला. इतर जिल्ह्यातील पोलिसांनी सहकार्य केले नाही तर संचालकांच्या अटकेची दाट शक्यता आहे. इतर जिल्ह्यातील पोलिसांमधील समन्वयाच्या अभावाचा फटका गुंतवणूकदार एजंटला बसू नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नाशिकप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाचे अशोक केंगन्नवर यांनी केली. दिलेल्या निवेदनानुसार विजापूर, अथणी, जमखंडी, बागलकोट, बेळगाव, पणजी, सांगली, कुडाळ, मालवण, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, जत, कराड, गडहिंग्लज, करमाळा अादी ठिकाणी कंपनीची कार्यालये आहेत. लाखो गुंतवणूकदारांनी करोडो रुपये मैत्रेयमध्ये गुंतवलेले आहेत. मुदत संपूनही अद्याप परतावा रक्कम मिळालेली नाही. ठेवीदार एजंटांना त्रास देत आहेत. या ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर विनायक चव्हाण, पी. बी. पाटील, दत्तात्रय शिंगाडे, प्रकाश मगदूस, नितीन पाटील यांच्यसह शंभर ते दीडशे ठेवीदार, एजंटांच्या निवेदनावर सह्या आहेत.
दिनांक यादी रक्कम
२९ जुलै १२५ १७ लाख १४ हजार ३९७
ऑगस्ट १५१ २१ लाख २२ हजार १५४
११ऑगस्ट ३४३ ४३ लाख २० हजार ६८८
१२ ऑगस्ट २४६ २० लाख ३० हजार ४८७
१६ ऑगस्ट २५९ २३ लाख ८१ हजार ५८०
१९ ऑगस्ट १११ लाख हजार ८८७
२० ऑगस्ट १३१ १३ लाख ८६ हजार ३३४
२४ ऑगस्ट ५०१ ४२ लाख ७६ हजार ३५३
२६ ऑगस्ट ३४३ ३१ लाख ४४ हजार १५३
३० ऑगस्ट ६०० ५२ लाख ४३ हजार २८६
सप्टेंबर २०१ १९ लाख ७६ हजार ४६७

दिनांक यादी रक्कम
सप्टेंबर २०९ १९ लाख ३६ हजार ५६२
सप्टेंबर २०३ १५ लाख ४५ हजार ६८४
१७ सप्टेंबर २०४ १९ लाख ९२ हजार ००६
२१ सप्टेंबर २२७ १९ लाख ३४ हजार ६९१
२२ सप्टेंबर ४०३ ३३ लाख ६० हजार ८५४
२९ सप्टेंबर ४२० २२ लाख ८० हजार ३४०
ऑक्टोबर १५५५ ५८ लाख ८७ हजार ५५८
२० ऑक्टोबर ४८१ ३३ लाख हजार ८५४
२७ ऑक्टोबर ४३१ ३० लाख ९० हजार ७९९
नोव्हेंबर २५३ १७ लाख ३० हजार १९७
(२९जुलै ते नोव्हेंबरदरम्यान २१ वेळा झाले वाटप)
दिनांक यादी रक्कम
२९ जुलै १२५ १७ लाख १४ हजार ३९७
ऑगस्ट १५१ २१ लाख २२ हजार १५४
११ऑगस्ट ३४३ ४३ लाख २० हजार ६८८
१२ ऑगस्ट २४६ २० लाख ३० हजार ४८७
१६ ऑगस्ट २५९ २३ लाख ८१ हजार ५८०
१९ ऑगस्ट १११ लाख हजार ८८७
२० ऑगस्ट १३१ १३ लाख ८६ हजार ३३४
२४ ऑगस्ट ५०१ ४२ लाख ७६ हजार ३५३
२६ ऑगस्ट ३४३ ३१ लाख ४४ हजार १५३
३० ऑगस्ट ६०० ५२ लाख ४३ हजार २८६
सप्टेंबर २०१ १९ लाख ७६ हजार ४६७

दिनांक यादी रक्कम
सप्टेंबर २०९ १९ लाख ३६ हजार ५६२
सप्टेंबर २०३ १५ लाख ४५ हजार ६८४
१७ सप्टेंबर २०४ १९ लाख ९२ हजार ००६
२१ सप्टेंबर २२७ १९ लाख ३४ हजार ६९१
२२ सप्टेंबर ४०३ ३३ लाख ६० हजार ८५४
२९ सप्टेंबर ४२० २२ लाख ८० हजार ३४०
ऑक्टोबर १५५५ ५८ लाख ८७ हजार ५५८
२० ऑक्टोबर ४८१ ३३ लाख हजार ८५४
२७ ऑक्टोबर ४३१ ३० लाख ९० हजार ७९९
नोव्हेंबर २५३ १७ लाख ३० हजार १९७
(२९जुलै ते नोव्हेंबरदरम्यान २१ वेळा झाले वाटप)
बातम्या आणखी आहेत...