आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैत्रेय’विराेधात तक्रारी वाढल्या, ३३ हजार अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मैत्रेय गुंतवणूकदारांची ठेवी परत मिळण्यासाठी संख्या वाढत असून, आजपर्यंत सुमारे ३३ हजार तक्रार अर्ज पोलिसांना प्राप्त झाले. एस्क्रो खात्यातून एक महिन्यात कोटी १४ लाखांच्या ठेवी वाटप झाल्या अाहेत. समितीकडून चेक परत गेलेल्या ठेवीदारांना प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, तक्रारदारांची वाढती संख्या बघता एस्क्रो खात्यात अवघे तीन कोटी शिल्लक असल्याने या गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्यास समितीला अडचण निर्माण होणार आहे.
मैत्रेय कंपनीकडून एस्क्रो खात्यात कोटी ३२ लाख रुपये जमा करण्यात अाले आहेत. या खात्यातून कोटी १४ लाखांच्या ठेवींचे वाटप ठेवीदारांना करण्यात अाले आहे. कंपनीच्या नाशिक जिल्ह्यातील सुमारे ३३ हजार ठेवीदारांनी पैसे परत मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. एक महिन्यात ३२२० ठेवीदारांच्या ठेवी वाटप करण्यात अाल्या अाहेत. समितीकडून ठेवी वाटप होण्याची गती बघता एस्क्रो खात्यात शिल्लक असलेले सुमारे साडेतीन कोटी रुपये एक महिन्यात वाटप होण्याची शक्यता आहे.

मैत्रेय कंपनीकडून आणखी रक्कम एस्क्रो खात्यात जमा करणे अपेक्षित होते. मात्र, पैसे भरण्यास कंपनीकडून दिरंगाई होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून कंपनीच्या मालकीची मालमत्ता विक्री करून ही रक्कम एस्क्रो खात्यात वर्ग करण्यासाठी धडपड सुरू आहे. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, अजय पन्हाळे, दिलीप शिंदे, सचिन अहिरराव हे जास्तीत जास्त रक्कम एस्क्रो खात्यात जमा व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत.

तर कंपनीच्या संचालकांवर कारवाई
कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांनी पैसे भरण्यास टाळाटाळ केल्यास सत्पाळकर यांचा अंतरिम जामीन रद्द होण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले. न्यायालयात खटला सुरू आहे. काही दिवसांत खात्यात पैसे भरल्यास कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...