आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैत्रेय’च्या गुंतवणूकदारांचे आता परताव्याकडे लक्ष, कंपनीवर विश्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘मैत्रेय’कंपनीकडून नाशिकसह राज्यभरातील २१ लाख गुंतवणूकदारांचा १३२० कोटी रुपयांचा परतावा कशाप्रकारे करणार, याकडे आता मैत्रेय गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. ‘मैत्रेय बचाव कृती समिती’कडे हजारो गुंतवणूकदारांनी पाठपुरावा सुरू केला आहे.
मैत्रेयच्या व्यवस्थापकीय संचालिका वर्षा सत्पाळकर यांच्या अटकेनंतर राज्यभरातील गुंतवणूकदार हवालदिल झाले होते. सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर जिल्ह्यातील १३७३ गुंतवणूकदारांनी पोलिसांत धाव घेत जबाब नोंदवले. या गुंतवणूकदारांचे कोटी ६० लाख ७४ हजार ८५२ रुपये परतावा कंपनीला देणे आहे. सत्पाळकर यांना न्यायालयाने अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. न्यायालयात ठरलेली रक्कम राज्यभरातील २१ लाख गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याबाबतचे विवरण सादर करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. सत्पाळकरांनी गुंतवणूकदारांच्या ठेवी परत करण्याची तयारी दर्शविल्याने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मैत्रेय बचाव कृती समितीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अटी-शर्तीचे पालन केल्यास सत्पाळकर यांच्यावर पुढील कारवाईचे पोलिसांचे नियोजन सुरू असल्याची माहिती पाेलिस सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...