आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैत्रेय’च्या १२५ गुं तवणूकदारांची यादी न्यायालयात, साेमवारी निर्णयाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -‘मैत्रेय’च्या ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पोलिस प्रशासनानेज्यांचे धनादेश न वटता परतअाले व ठेवींची मुदत पूर्ण झाली अाहे, अशांची प्राधान्य यादी तयारकरून त्यातील प्राथमिक १२५ठेवीदारांची यादी येत्या साेमवारीन्यायालयात सादर करण्यात येणारअाहे. न्यायालयाची परवानगीमिळताच ‘एस्क्रो’ खात्यात जमाझालेल्या रकमेतून साधारणत:१५ ते २० लाखांपर्यंतच्या ठेवींचे वितरण सुरू करण्यात येणार अाहे.याबाबतचे पाेलिसांनी नियाेजन पूर्णकेले असून, ठेवीदारांमध्येविश्वासनिर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचेसांगण्यात अाले. मैत्रेय कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना न्यायालयाने २० जूनपर्यंत अंतरिम जामिनास मुदतवाढ दिली आहे. या कालावधीत कंपनीकडून एस्क्रो खात्यात ४ कोटी ७४ लाख रुपये जमा करणे बंधनकारक आहे. पोलिसांनी अातापर्यंत सत्पाळकर यांच्याकडून सुरुवातीला १ कोटी ४७ लाख आणि १२५ बँक खात्यातील १ कोटी १२ लाखांची रक्कम अशी एकूण उर्वरित. कोटी ६० लाखांची रक्कम एस्क्राेत जमा झाली अाहे. उर्वरित कोटी ३० लाखांची रक्कम दोन महिन्यांत भरावयाची आहे. सत्पाळकर यांच्याकडून मैत्रेय कंपनीची नाशिक, पुण्यातील मालमत्ता विक्रीसाठी पाेलिसांकडे परवानगी मागितली असून, त्यासाठी पाेलिसांनी सकारात्मकता दर्शविली अाहे. सत्पाळकर यांनीदेखील गुंतवणूकदारांचे सर्व पैसे परत देण्याची तयारी दाखविली असल्याने गुंतवणूकदारांच्या ठेवी परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कंपनीची देशभरात १७ हजार एकर जमीन आहे. या सर्व मालमत्तेची किंमत सुमारे १०० कोटींच्यावर आहे. मात्र, सेबीचे निर्बंध आणि आर्थिक मंदी यामुळे कंपनीला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. गुंतवणूकदारांमध्ये पैसे परत मिळणारच नाही याबाबत झालेला संभ्रम दूर करण्यासाठी पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांनी एस्क्राे खात्याचा अाग्रह धरला. त्यामुळेच त्यात अडीच काेटींची रक्कम जमा झाली असून, अातापर्यंत पाेलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांनुसार त्यात प्राधान्यक्रम ठरवून यादी तयार करण्यात अालेली अाहे. यात पहिल्यांदा १२५ गुंतवणूकदारांचे सुमारे १५ ते २० लाख रुपये परत करण्यासाठी न्यायालयाकडे यादी सादर केली जाणार अाहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यासह देशभरातील गुंतवणूकदारांचे पैसे वाटपाची प्रक्रिया सुरळीत सुरू हाेणार असल्याचे पेालिस सूत्रांनी सांगितले.

ठेवीदारांना पैसे मिळवून देणार
^ मैत्रेय विराेधात याेग्य रीतीने तपास केला वठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची भूमिकाघेतली. एस्क्राे खात्यात कंपनीकडून २ काेटी६० लाखांची रक्कम जमा झाली. अाणखी रक्कम जमा हाेण्याची शक्यता अाहे. ही रक्कम ठेवीदारांना परत करण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता केली जात अाहे. - एस. जगन्नाथन, पाेलिस अायुक्
मैत्रेयकडून सकारात्मक प्रतिसाद
^मैत्रेयकडून पोलिस यंत्रणेला सहकार्य केले जात आहे. ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी दाखविलेला सकारात्मक प्रतिसाद आणि कंपनीच्या मालकीच्या मालमत्तेची किंमत बघता राज्यासह देशभरातील गुंतवणूकदारांच्या ठेवी टप्प्याटप्प्याने परत मिळणे शक्य आहे. - अॅड. राहुल कासलीवाल (सत्पाळकरयांचे वकील)