आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैत्रेय’च्या २० हजार ठेवीदारांना पैसे मिळण्याची अजूनही प्रतीक्षाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘मैत्रेय’कंपनीच्या जिल्ह्यातील सुमारे २० हजार ठेवीदारांना ठेवी मिळण्याची आशा लागून आहे. मात्र, एस्क्रो खात्यात अवघे कोटी २१ लाख रुपये शिल्लक आहेत. ३२२० ठेवीदारांना कोटी १४ लाखांचे वाटप झाले आहे. उर्वरित ठेवी एक महिन्यात वाटप होण्याची शक्यता आहे.

खात्यातील ही रक्कम प्राधान्यक्रम यादीनुसार ठेवीदारांना वाटप झाल्यानंतर खात्यात पैसेच शिल्लक राहणार नसल्याचा अंदाज आहे. कंपनीकडून सुरुवातीला भरलेली रक्कम वगळता काहीही रक्कम भरली नसल्याने या ठेवीदारांच्या ठेवी परत कशा करायच्या या विंचनेत समिती आणि पोलिस आहेत.

‘मैत्रेय’ कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांच्यासह संचालकांना ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याच्या अटी-शर्तीवर अंतरिम जामीन मंजूर झाला. न्यायालयाच्या एेतिहासिक आदेशाने ठेवीदारांना एस्क्रो खात्यातून ठेवी जमा होण्यास सुरुवात झाली. दीड महिन्यापासून ठेवी वाटप होण्याची प्रक्रिया सुरू आहे. कंपनीकडून एस्क्रो खात्यात काही रक्कम जमा करण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयास दिले होते. मात्र, सुरुवातीस सुमारे कोटी ३५ लाखांची रक्कम वगळता कंपनीने अद्याप एक रुपयाही खात्यात भरलेला नाही. ठेवीदारांच्या ठेवी यादीनुसार वाटप होत आहे.

एस्क्रोे खात्यात अवघे कोटी २१ लाख रुपये शिल्लक आहेत. सुमारे हजार गुंतवणूकदारांच्याच ठेवी वाटप होऊ शकतील. कंपनीकडून मालमत्ता विक्री करून या व्यवहाराचे सर्व पैसे खात्यात जमा करणार असल्याचे सांगण्यात आले होते. मैत्रेय कंपनीकडून मालमत्ता विक्री करण्यास दिरंगाई होत आहे. वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, विजय पन्हाळे, दिलीप शिंदे, सचिन अहिरराव या तपासी पथकाकडून रक्कम भरण्यासाठी तगादा सुरू आहे. मात्र, कंपनीच्या संचालक आणि प्रतिनिधींकडून प्रतिसाद मिळत नसल्याने पथकाने कारवाईची शक्यता व्यक्त केली आहे.

‘मैत्रेय’च्या विरोधात परभणी, अमरावती, नागपूर, धुळे अादी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. नाशिकप्रमाणे या ठेवीदारांच्या ठेवी परत करणार असल्याचे अाश्वासन देत संचालकांनी जामीन मिळवला. पोलिसांकडे प्राप्त तक्रारीनुसार, ३३ कोटींची फसवणूक आहे. दोषारोप पत्रानुसार राज्यासह देशभरातील २० लाख गुंतवणूकदारांची सुमारे १२०० कोटींची कंपनीकडून फसवणूक झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...