आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एस्क्राे’मध्ये मैत्रेय जमा करणार ११ कोटी रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘मैत्रेय’कंपनीच्या ठेवीदारांना न्यायालयाच्या अादेशान्वये एस्क्राे खात्यात जमा असलेली रक्कम वितरित करण्याचे काम सुरू असतानाच, ही रक्कम संपत अाल्याने कंपनी पुन्हा रक्कम जमा करते की नाही, असा पेच निर्माण झाला हाेता. मात्र, कंपनीकडून येत्या अाठवडाभरात ११ काेटी रुपयांची रक्कम या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे दिवाळीच्या ताेंडावर ठेवीदारांना अाशेचा किरण दिसत असून, पाेलिसांनी तत्परता दाखविल्यास ठेवीदारांचीही दिवाळी आनंदात साजरी होणार आहे. अातापर्यंत मैत्रेय कंपनीकडून ठेवीदारांना सुमारे पाच कोटींचे वाटप झाले असून, अाणखी अाठवडाभरात एक काेटीपर्यंतचे वाटप हाेणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यासह ऑनलाइन अर्ज केलेल्या राज्यातील ठेवीदारांच्या ठेवी थेट खात्यात जमा होणार असल्याने ठेवीदारांना पाेलिस ठाण्यापर्यंतही येण्याचीही अावश्यकता नसल्याचेही सांगण्यात अाले.
मैत्रेय कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांनी ठेवीदारांचे हित लक्षात घेत नाशिकसह राज्यातील सर्व ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह परत देण्याची तयारी दर्शवल्याने एस्क्रो खात्यात सुमारे काेटी २५ लाखांची रक्कम जमा केली. न्यायालयाकडे सत्पाळकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार देशभरातील मालमत्ता विक्री करून ठेवीदारांच्या ठेवी देण्यासाठी बांधील असून, टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जात अाहेत.

या एस्क्राे खात्यातून कंपनीच्या प्रतिनिधींनी चेक बाऊन्स झालेल्या नाशिक जिल्ह्यातील ठेवीदारांना प्रथम ठेवींचे वितरण सुरू केले. खात्यातून आजपर्यंत हजार २३२ ठेवीदारांना कोटी ८३ लाख ८१ हजार रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात अाली अाहे. पाेलिसांकडे ठेवीदारांकडून ठेवींची रक्कम देण्याबाबत वारंवार चाैकशी केली जात असतानाच ‘एस्क्रो’तील रक्कमही कमी राहिल्याने ठेवीदारांच्या ताेंडचे पाणी पळाले हाेते. यामुळे पाेलिसांकडूनही ठेवीदारांना संयम राखण्याबराेबरच प्रसंगी कंपनीच्या संचालकांना अटकेची भीतीही दाखविली जात हाेती. तर, कंपनीकडून पाेलिसांच्या अटी शर्तींमुळे तांत्रिक अडचणी येत असल्याचे बाेलले जात हाेते. अखेरीस कंपनीने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करीत सरकारवाडा पाेलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून निर्माण केलेल्या कायदेशीर ‘प्रक्रिया’ पूर्ण करण्याची तयारी दर्शविल्याने कंपनीने मालमत्ता विक्री करून पैसे जमा करण्याचे सूताेवच केले.

मैत्रेय कंपनीकडून स्थावर मालमत्ता विक्रीचे ११ काेटी रुपये एस्क्रो खात्यात जमा होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच मैत्रेयच्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आणखी काही मालमत्ता विक्री करण्यात येणार आहेत. त्यानंतर या व्यवहारातून प्राप्त हाेणारी रक्कमही या ‘एस्क्रो’मध्ये जमा होणार असल्याने जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यातील सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एेन दिवाळीमध्ये ही रक्कम मिळणार असल्याने मैत्रेयच्या ठेवीदारांना दिलासा मिळाला असून, या ठेवीदारांची दिवाळी खऱ्या अर्थाने गाेड हाेणार अाहे.

कंपनीसमाेर अडचणी
कंपनीकडून नाशकात एस्क्राे खात्यात रक्कम जमा केली जात असतानाच, मात्र राज्यभरातील विविध जिल्ह्यांत पाेलिसांनी कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल केल्याने अडचणीत वाढ झाली अाहे. त्यामुळे कंपनीला संबंधित जिल्ह्यातूनही पाेलिसांकडून एस्क्राे खाते उघडण्याचा दबाव येत असल्याने कंपनीचे प्रतिनिधी संभ्रमात पडले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...