आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रेयच्या ठेवी परत मिळण्यासाठी गुंतवणूकदरांना ‘ऑनलाइन’ सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मैत्रेय कंपनीच्या ठेवी परत मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. यासाठी पोलिस ठाण्यात जाण्याची गरज नसून कंपनीच्या www.maitreyaplotters.com संकेतस्थळावर ठेवीसंबंधी माहिती भरून ठेवीदारांच्या ठेवी थेट खात्यात जमा होणार आहेत. पोलिसांकडून कंपनीच्या संचालकांना आदेशित करण्यात आल्यानंतर कंपनीकडून संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे.

मैत्रेय कंपनीचे संकेतस्थळ सुरू झाल्याने ठेवीदारांना यात ठेवीचा प्रकार, मुदतीचा कालावधी आणि बँकेसंबंधी माहिती द्यावी लागणार आहे. ही माहिती देण्यासाठी ठेवीदारांना पोलिस ठाण्यात पायपीट करावी लागत होती. पोलिसांचे काम वाढले होते. ठेवीदारांच्या गर्दीमुळे ठाण्यातील दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याने पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून कंपनीचे संकेतस्थळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कंपनीचे अजित घोसाळकर यांनी संकेतस्थळ कार्यान्वित केले. संकेतस्थळामुळे ठेवीदारांना आता ऑनलाइन अर्ज करून ठेवी परत मिळवणे शक्य होणार आहे. शासनाच्या एस्क्रो खात्यातून आजपर्यंत ठेवीदारांना सुमारे कोटी ६० लाखांच्या ठेवी परत मिळाल्या आहेत. ऑनलाइन अर्जामुळे आता ठेवीदारांना अर्ज करणे सोयीस्कर होणार आहे. पोलिसांचेही काम कमी होणार आहे. कंपनीकडून खात्यात आणखी ते कोटी रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्व ठेवीदारांच्या ठेवी वाटप झाल्यानंतर इतर जिल्ह्यांतील ठेवीदारांच्या ठेवी एस्क्रो खात्यातून जमा होण्यास सुरुवात होणार अाहे. निरीक्षक डॉ.कोल्हे, अजय पन्हाळे, दिलीप शिंदे, सचिन अहिरराव यांच्या प्रयत्नांमुळे कंपनीकडून खात्यात पैसे जमा करण्याचे संकेत मिळत आहेत. ठेवीदारांची दिवाळी पोलिसांच्या प्रयत्नांमुळे आनंदात साजरी होणार असल्याने ठेवीदारांकडून पोलिस प्रशासनाचे अाभार व्यक्त होत आहेत.

असा करा अर्ज
संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर अर्ज नमुना येईल. यामध्ये पॉलिसी नंबर, ठेवी जमा केल्याची तारीख, कार्यालयाचे नाव, पॉलिसी नंबर, तारीख, ठेवी रक्कम, बँक नाव, आयएफसी कोड, खाते नंबर अादी माहिती या संकेतस्थळावर भरल्यानंतर संदेश प्राप्त होईल. भरलेली माहिती बरोबर असल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर अर्ज बरोबर भरल्याचे समजावे. यादीनुसार ठेवीदारांना समितीकडून फोन आल्यानंतर मूळ कागदपत्रे घेऊन पोलिस ठाण्यात जावे.
बातम्या आणखी आहेत...