आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैत्रेय’कडून ‘एस्क्रो’त अाणखी दाेन काेटींचा भरणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या दाेन महिन्यांपासून एस्क्राे खात्यात रुपयाही भरणाऱ्या मैत्रेय कंपनीने अखेर न्यायालयातील सुनावणीपूर्वीच सुमारे दोन काेटींचा भरणा केल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. कंपनीकडून अातापर्यंत एस्क्रोत कोटी लाख जमा झाले अाहेत. पाेलिसांनी न्यायालयाकडे या रकमेचे ठेवीदारांना वितरण करण्यासाठी केलेल्या मागणी अर्जावरही मैत्रेय कंपनीने तयारी दर्शविल्याने ठेवीदारांच्या अाशा पल्लवित झाल्या असून, यावर जुलैला निर्णय हाेणार अाहे. दरम्यान, संशयित वर्षा सत्पाळकर यांच्या जामिनाची मुदत अाणखी १२ दिवसांनी वाढविली असून, जुलैला पुन्हा सुनावणी ठेवण्यात अाली अाहे. हजाराे गुंतवणूकदारांना काेट्यवधींना गंडा घातल्याप्रकरणी मैत्रेय कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर चार संचालकांना अटकेनंतर तात्पुरता जामीन मंजूर झाला हाेता. न्यायालयाच्या अटी-शर्तींनुसार कंपनीकडून एस्क्रो खात्यात पैसे भरण्यासाठी सत्पाळकर यांना वेळाेवेळी दिलेल्या मुदतवाढीनुसार कंपनीकडून खात्यात कोटी लाखांचा भरणा करण्यात आला आहे. साेमवारी(दि. २०) संशयित सत्पाळकर यांच्या जामिनास मुदतवाढ देण्याच्या अर्जावर न्यायालयात सुनावणीवेळी सरकारी वकील पंकज चंद्रकोर आणि वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी तक्रारदारांची वाढलेली संख्या तसेच फसवणुकीचा आकडा २० कोटींच्या वर पाेहोचण्याची शक्यता निदर्शनास आणून दिली. त्यावर कंपनीची जसजशी मालमत्ता विक्री हाेत अाहे, तसतसे पैसे एस्क्राेत जमा केले जात अाहे, असे सत्पाळकर यांचे वकील राहुल कासलीवाल यांनी न्यायालयास सांगितले. पाेलिसांच्या पहिल्या अहवालानुसार फसवणुकीचा अाकडा काेटी ७५ लाख रुपये असताना अातापर्यंत कंपनीने त्यापेक्षा जादाची रक्कम खात्यात जमा केली अाहे. पाेलिसंानी न्यायालयात ठेवीदारांना ही रक्कम वितरित करण्याची परवानगी मिळण्यासाठी केलेल्या अर्जावरही कुठलीही हरकत नाही. ठेवीदारांचा अाकडा वाढल्यास त्याप्रमाणे पैसे पुढेही भरण्यात येतील, असेही कासलीवाल यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने सत्पाळकर यांच्या अंतरिम जामिनास जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. सत्पाळकर यांनीदेखील पोलिसांना सकारात्मक प्रतिसाद देत पाथर्डीतील मालमत्तेची रक्कम एस्क्रो खात्यात भरली. आणखी कोटी भरण्याची तयारी सुरू आहे

गुंतवणूकदारांना दिलासा : आणखी काही मालमत्ता विक्री करण्यासाठी रजिस्टर कार्यालयांना निर्बंध उठवण्यासाठी पत्र दिले आहे. सेबीकडे मालमत्तेवरील निर्बंध उठवण्यासाठी कंपनीकडून पाठपुरावा सुरू आहे. कंपनीने सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनास लेखी दिले असल्याने गुंतवणूकदारांच्या ठेवी परत मिळण्याची शक्यता वाढली आहे.

पैसे भरण्यासाठी पाठपुरावा
कंपनीच्या संचालिका सत्पाळकर यांच्याकडे रक्कम भरण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. काही मालमत्तेवरील निर्बंध उठवले आहेत. त्याचप्रमाणे एस्क्राे खात्यातील रक्कम वितरित करण्यासाठी न्यायालयाकडे पाठपुरावा सुरू असून, त्यावर जुलै राेजी निर्णय अपेक्षित अाहे. -डॉ. सीताराम कोल्हे, तपासी अधिकारी
बातम्या आणखी आहेत...