आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैत्रेय’ने खात्यात भरले अाणखी २ काेटी रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दाेन महिन्यांपासून एक रुपयाही न भरणाऱ्या मैत्रेय कंपनीने अखेर साेमवारी न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी दाेन काेटी रुपयांचा एस्क्राे खात्यात भरणा केला. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला अाहे. कंपनीकडून अातापर्यंत ५ कोटी ९ लाख रुपये खात्यात जमा झाले अाहेत. हे पैसे ठेवीदारांना परत करण्यासाठी पाेलिसांनी न्यायालयाकडे अर्ज केला असून त्यावर २ जुलै राेजी निर्णय अपेक्षित अाहे.

दरम्यान, कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांच्या जामिनाची मुदत १२ दिवस वाढवण्यात अाली अाहे.
राज्यातील हजाराे गुंतवणूकदारांना काेट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी मैत्रेय कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर व चार संचालकांना न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला हाेता. न्यायालयाच्या अटी-शर्तींनुसार कंपनीकडून एस्क्रो खात्यात पैसे भरण्यासाठी सत्पाळकर यांना वेळाेवेळी मुदतवाढही दिली होती. या मुदतीत कंपनीकडून एस्क्राे खात्यात ५ कोटी ९ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे.

साेमवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकील पंकज चंद्रकोर आणि वरिष्ठ पाेलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी तक्रारदारांची वाढलेली संख्या पाहता फसवणुकीचा आकडा २० कोटींच्या वर पाेहोचण्याची शक्यता निदर्शनास आणून दिली. त्यावर ‘कंपनीची जसजशी मालमत्ता विक्री हाेत अाहे, तसतसे पैसे एस्क्राेत जमा केले जात अाहेत’ असे सत्पाळकर यांचे वकील राहुल कासलीवाल यांनी न्यायालयास सांगितले.

पाेलिसांच्या पहिल्या अहवालानुसार, फसवणुकीचा अाकडा ४ काेटी ७५ लाख रुपये हाेता. अातापर्यंत कंपनीने त्यापेक्षा जादाची रक्कम खात्यात जमा केली अाहे. त्याचबराेबर पाेलिसांनी ठेवीदारांना ही रक्कम वितरित करण्याची परवानगी मिळण्यासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जावरही अामची कुठलीही हरकत नाही. ठेवीदारांचा अाकडा वाढल्यास त्याप्रमाणे पैसे पुढेही भरण्यात येतील, असेही कासलीवाल यांनी स्पष्ट केले.

पैसे भरण्यासाठी पाठपुरावा
कंपनीच्या संचालिका सत्पाळकर यांच्याकडे रक्कम भरण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. काही मालमत्तेवरील निर्बंध उठवले आहेत. त्याचप्रमाणे एस्क्राे खात्यातील रक्कम वितरित करण्यासाठी न्यायालयाकडे पाठपुरावा सुरू असून त्यावर २ जुलै राेजी निर्णय अपेक्षित अाहे. - डॉ. सीताराम कोल्हे, तपासी अधिकारी
बातम्या आणखी आहेत...