आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मैत्रेय’च्या गुंतवणूकदारांना ११ जुलैपासून ठेवी वाटपाची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘मैत्रेय’कंपनीच्या वतीने एस्क्रो खात्यात तब्बल २५० काेटी रुपये भरण्याचे प्रतिज्ञापत्र रकमेच्या विवरणासह सादर केल्याने ठेवीदारांना ठेवी परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या अाहेत. १२५ गुंतवणूकदारांसह मुदत पूर्ण झालेले आणि परत गेलेले चेक तसेच पोलिसांत तक्रार दिलेल्या सर्व गुंतवणूकदारांचे पैस वाटप करण्यासाठी पोलिस, कंपनी, शासन प्रतिनिधी आणि ठेवीदारांपैकी एका सदस्याची एक स्वतंत्र समिती गठित होणार असल्याने कंपनीच्या ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. ठेवी वाटप होणारा हा राज्यातील पहिलाच गुन्हा ठरणार आहे.

मैत्रेय कंपनीकडून अडीचशे कोटी रुपये एस्क्रो खात्यात जमा करण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात अाले अाहे. न्यायालयाने सत्पाळकर यांना ११ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. सरकारवाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी १० हजार २७५ तक्रारी प्राप्त झाल्या असून, एकूण २४ काेटी ६२ लाख ५० हजार ८३७ रुपये इतक्या रकमेचा अपहार झाला अाहे. पोलिसांनी शोधलेल्या बंगळुरू येथील कंपनीच्या मालमत्तेपैकी सुमारे अडीचशे कोटी रुपये एस्क्रो खात्यात जमा होणार असल्याने कंपनीच्या ठेवीदारांच्या ठेवीच्या अतिरिक्त रक्कम खात्यात जमा झाली आहे. दरम्यान, कंपनीकडूनही ठेवीदारांच्या ठेवी वाटप करण्यास पोलिस प्रशासनाची हरकत नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, गुंतवणूकदारांची काही एजंटकडून दिशाभूल केली जात असल्याने कंपनीच्या विरोधात गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. संचालिका वर्षा सत्पाळकर यांच्याकडून पोलिसांना तपासामध्ये सहकार्य केले जात आहे. पोलिस आणि कंपनीकडून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्या या दृष्टीकोणातून प्रथमच कायद्याच्या पलीकडे तपास सुरु असल्याने कंपनीच्या सर्वच ठेवीदारायच्या ठेवी परत मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यामुळे ठेवीदारांना अाता या निर्णयाची प्रतीक्षा अाहे.

गुंतवणूकदारांनी संयम पाळावा
मैत्रेय कंपनीच्या मालमत्तेवरील निर्बंध हटवल्याने विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. मालमत्ता विक्री करून कंपनी एस्क्रो खात्यात पैसे जमा करत आहे. कायदेशीर प्रक्रिया असल्याने ठेवी वाटप करण्यासाठी समिती गठित होणार आहे. लवकरच ठेवी परत मिळण्याची कार्यवाही सुरू होईल. गुंतवणूकदारांनी संयम पाळण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील पहिलाच गुन्हा ठरणार
दामदुप्पटच्या नावाखाली नाशिकमध्ये विकल्प, इमू, समृद्धी, केएफसी, केबीसी अादी कंपन्यांकडून नागरिकांच्या शेकडो कोटींच्या ठेवी बुडवल्या, मात्र मैत्रेय कंपनीच्या संचालकांकडून पोलिसांना तपासात सहकार्य केले. कंपनीने मालमत्ता विक्री करून ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याची तयारी दाखवल्याने ठेवीदारांच्या ठेवी परत करणारा हा राज्यातील पहिलाच गुन्हा ठरला आहे.
बातम्या आणखी आहेत...